केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना व विकासकामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.
पुण्यात आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
विरोधकांवर टिका करताना फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला की, 2023 ला या बिलाचा समर्थन केले होते तर आज त्याचा विरोध का करता?
आज जर या ठिकाणी महिला आरक्षणाचा विरोध करणारा कुणी असेल तर ते म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे हे यूपीएससी पक्षातील सदस्य आहेत. माननीय मोदीजी एकदा जे ठरवतात ते करून दाखवतात आणि त्यामुळेच 2029 ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अरे सफर मे धूप तो होगी जो चल सको तो चलो
सफर मे धूप तो होगी जो चल सको तो चलो
सभी है भीड मे तुम भी निकल सको तो चलो
किसी के वास्ते राहे कहा बदलती है
तुम अपने आपको खुदी बदल सको तो चलो
त्यामुळे तुम्ही जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला बदललं नाही
बंधू-भगिनींनो आज खऱ्या अर्थाने या पुण्यामध्ये ज्या पुण्याने महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, विधवा विवाह असेल कुटुंब नियोजन असेल सती प्रथेची बंदी असेल केशवपण बंदी असेल अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी सुधारणाच्या पुण्याने केल्या.
त्याच पुण्यामध्ये येऊन या ठिकाणी दिशाभूल करण्याचे काम होत आहे, तुम्ही आणि आम्ही सत्य घेऊन जर जनतेमध्ये गेलो तर जनतेला महिलांचा खरा कैवारी कोण आहे ते स्पष्ट होईल.
महिलांकरता स्वातंत्र्यानंतर 12 कोटी घरांमध्ये शौचालय बांधणारे नरेंद्र मोदी आहेत, या चार कोटी कुटुंबाला घर मिळाले, त्यातील 70% घरांवर घरच्या लक्ष्मीचे नाव लिहिणारे हे नरेंद्र मोदी आहेत, ज्या महिलांनी कधी बँकेत खाते बघितलं नव्हतं त्यांना बँकेतला खाते देणारे नरेंद्र मोदी आहेत, बेटी बचाव पासून बेटी पढाओपर्यंत आणि आता लखपती दीदी पर्यंत या भारताला नेणारे मोदीजी आहेत.
या भारताच्या सेनेमध्ये ज्यावेळी आमच्या महिलांनी अधिकार मागितला तेव्हा आमच्या महिलाही सशक्तपणे लढू शकतात हे ओळखणारे मोदीजी आहेत. त्यांना ते कमिशन देणारे मोदीजी आहेत आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला आहेत.
या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, नितेश राणे, जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
देश पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असेही फडणवीस म्हणाले.