Saturday, August 29, 2026

मुंबई पोलिसांचा तो दरारा… अजूनही आहे की नाही?…

Share

मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथे ईद ए मिलादच्या निमित्ताने एक मिरवणूक काढण्यात आली… या मिरवणुकीसाठी पुढाकार घेतला होता शिवसेना (उबाठा) चे  स्थानिक आमदार हारून खान यांनी… त्यांची मुलगी सबा हारून खान (उर्फ सबाह आवेश घिवाला-खान) इथल्या नगरसेविका आहेत…

या मिरवणुकीच्या मार्गावर असलेले हनुमान मंदिर कापडाने झाकण्याचा प्रकार स्थानिक आंबोली पोलीस स्टेशनने केल्यामुळे तिथल्या सकल हिंदू समाजात संतापाची तीव्र लाट उसळली  आहे… मंदिर कापडात लपेटण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा प्रश्न हिंदू समाजाकडून विचारला जात आहे…

मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले… चित्ररथावर भारताच्या  नकाशाच्या मधोमध मशीद दाखवण्यात आली होती…. ‘मशीद वही बनाएंगे’च्या घोषणा देखील देण्यात आल्या… या सगळ्या जिहाद्यांवर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का हे समजायला मार्ग नाही परंतु “कायदा सुव्यवस्थे”च्या नावाखाली मारुतीरायाचे देऊळ १२ तासांपेक्षा अधिक काळ पांढऱ्या कापडाने गुंडाळण्याचा पुरुषार्थ मात्र पोलिसांनी तत्परतेने गाजवला आहे…

मुंबई पोलिस म्हणजे भितीयुक्त दरारा अशीच आजपर्यंत त्यांची ओळख आहे… इस्लामिक रिपब्लीक ऑफ पाकिस्तान समर्थित जिहादी आतंकवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या मुंबई पोलीसांनी कोणाला घाबरून मंदिर झाकले?… या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल…

आज मुंबई पोलिसांनी ईदच्या मिरवणुकीसाठी मंदिर झाकले आहे… उद्या मिरवणुकीच्या काळात हिंदूंना घराबाहेर पडू नका म्हणून सांगतील… आणि परवा या वस्तीतच राहू नका म्हणून सांगतील… मुंबई हिंदू बहुल भारतात आहे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आहे?… आणि मुंबई पोलिसांच्या कमरेला लटकवलेली पिस्तुले गंजलेली आहेत की भातुकलीतली असे प्रश्न स्वाभाविकपणे विचारले जातील…

मिरवणुकीच्या दरम्यान मंदिराला काही धोका पोहोचला असता तर त्या जिहाद्यांची कायमची खोड मोडण्याची धमक पोलिसांनी दाखवायला हवी होती… सकल हिंदू समाज देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता… पण इथे मात्र उफराटा न्याय लावण्यात आला… पोलिसांनी नुसत्या मारुतीरायावरच नव्हे तर सकल हिंदू समाजाच्या भावनांवरच घाला घातला आहे…

११ ऑगस्ट २०१२ रोजी रज़ा अकादमीच्या आझाद मैदानावरील मोर्चाच्या वेळी जिहादी मानसिकतेच्या मोर्चेकर्‍यांनी मुंबई पोलिसांची… विशेषतः महिला पोलिसांची काय विटंबना केली होती ते आंबोली पोलीस स्टेशन विसरले काय?… त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या कमरेला लटकलेल्या पिस्तुला मधून अचूक नेम धरून पाच पन्नास गोळ्या झाडल्या असत्या तर आज मंदिर झाकण्याची ही लांछनास्पद वेळ मुंबई पोलिसांवर आली नसती… आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रझा अकादमीने मोर्चा काढला तर बहुदा बंदोबस्तावरील महिला

पोलिसांना देखील पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवण्यात येईल…

मंदिर कापडाने झाकण्याचे आदेश महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून येणे असंभव वाटते… हा निर्णय स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनीच आपल्या अखत्यारीत घेतला असावा… ही त्यांनी शोधलेली पळवाट आहे… गृहखात्याने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे… जर तुम्ही एका देवळाचे रक्षण करू शकत नसाल तर तुमच्या हद्दीतील हिंदू समाजाचे रक्षण कसे करणार?… की त्यांनाही कापडात गुंडाळून ठेवणार आहात?… तुम्हा मुंबई पोलिसांचा तो दरारा… अजूनही आहे की नाही?… असे खरमरीत प्रश्न जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांना विचारले पाहिजेत… आणि परत असा प्रकार घडता कामा नये… अन्यथा सकल हिंदू समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेची जी गंभीर स्थिती निर्माण होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल… अशी तंबीही दिली पाहिजे…

आमदार हारून खान ज्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आहेत… त्या पक्षाचे प्रमुख मियां उद्धव बाळासाहेब ठाकरे

याविषयी तोंड देखील उघडतील अशी शक्यता नाही… कारण मुस्लिम मतांच्या लांगूलचालना पायी त्यांनी काँग्रेसलाही मागे टाकले आहे… अजान स्पर्धा भरवणाऱ्या, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब म्हणून उल्लेख करणाऱ्या आणि वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला संसदेत विरोध करणाऱ्या शिवसेना (उबाठा) कडून सकल हिंदू समाजाच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत…

कोणताही अपराध करण्यापूर्वी गुन्हेगार या गुन्ह्याचा परिणाम काय होईल याचा सर्वप्रथम विचार करतो… परिणाम जर आपल्याला झेपणारे नसतील तर तो सहसा गुन्हा करायला धजावत नाही… त्यातून सुदैवाने आजपर्यंत मुंबई पोलिसांचा इतका दरारा आहे की… मिरवणुकी पूर्वी वाटेतल्या मंदिराला केसा एवढाही धक्का पोहोचला तर गाठ आमच्याशी आहे…  एवढी जरी तंबी मुंबई पोलिसांनी आयोजकांना दिली असती… तरी मंदिर कापडात गुंडाळण्याचा शेळपटपणा त्यांना करावा लागला नसता…

कापडात गुंडाळून मंदिर सुरक्षित राहील असा जर पोलिसांचा भ्रम असेल तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो… आपण मंदिराच्या वाटेला गेलो तर पोलीस जागेवरच आपल्याला कापडात गुंडाळतील… ही भीती ज्या दिवशी जिहाद्यांच्या काळजात धडकी भरवेल… त्यादिवशी कापडात न गुंडाळताही केवळ मुंबईतीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील मंदिरे सुरक्षित राहतील…

मुंबई ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी आहे… ती आपल्या “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला स्मरून ती सुरक्षित राखणे मुंबई पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे… त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आपल्या क्षात्रतेजाचा परिचय द्यावा लागला तर त्यांनी तो जरूर द्यावा…

अन्य लेख

संबंधित लेख