Wednesday, September 2, 2026

भारताचा पहिला Imaging satellite: ४ सप्टेंबरला GSLV-F17/EOS-05 चे प्रक्षेपण

Share

शेतीपासून पूर-आपत्ती व्यवस्थापनापर्यंत मोठा फायदा

भारताच्या अंतराळ कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO कडून GSLV-F17/EOS-05 या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे प्रक्षेपण ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी करण्याचे नियोजन आहे. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या Second Launch Pad वरून प्रक्षेपित करण्यात करण्यात येणार आहे. ISROने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या मिशनची माहिती आणि प्रक्षेपणाची वेळ जाहीर केली आहे. या मोहिमेतील GSLV-F17 हे भारताच्या Geosynchronous Satellite Launch Vehicleचे १९वे उड्डाण आहे. या रॉकेटच्या माध्यमातून EOS-05 या अत्याधुनिक Earth Observation satellite ला Sub-Geosynchronous Transfer Orbit (Sub-GTO) मध्ये स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

EOS-05 म्हणजे काय?
EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ISROच्या मते हा Geosynchronous orbit मधून imaging करणारा भारताचा पहिला उपग्रह आहे. त्याचे उद्दिष्ट मोठ्या क्षेत्राचे वारंवार आणि जवळपास real-time स्वरूपात निरीक्षण करण्याची क्षमता निर्माण करणे आहे. EOS-05 हा अंतराळातील अत्याधुनिक कॅमेरासारखा काम करणार आहे. पृथ्वीवरील मोठ्या भागाचे चित्रण करून नैसर्गिक संसाधने, जमिनीवरील बदल आणि आपत्तीजन्य घटनांचे निरीक्षण करण्यासाठी त्याचा डेटा उपयोगी ठरणार आहे.या उपग्रहाला GISAT-1A या नावानेही संबोधले जाते.


मोठ्या क्षेत्रावर वारंवार नजर
EOS-05चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची Geosynchronous orbitमधून imaging करण्याची क्षमता. पृथ्वी निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध satellites कडून मिळणारा data शेती, जलसंपदा, पर्यावरण, ग्रामीण विकास, शहरी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरला जातो. EOS-05मुळे मोठ्या क्षेत्राचे वारंवार निरीक्षण करता येणे शक्य होईल. त्यामुळे पूर, भूस्खलन, जंगलातील आग किंवा जमिनीवरील अचानक झालेल्या बदलांसारख्या घटनांचे निरीक्षण अधिक वेगाने करण्यास मदत होऊ शकते.
या अंतराळ यानाचे फायदे


शेतीसाठी उपयुक्त ठरणार
भारतासारख्या कृषिप्रधान देशात उपग्रह निरीक्षणाचे महत्त्व मोठे आहे. पिकांचे क्षेत्रफळ, पिकांची स्थिती, जमिनीतील बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा शेतीवर झालेला परिणाम यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी Earth Observation data उपयोगी ठरतो. ISROने satellite data वापरून हंगामात पिकांची पेरणी आणि कापणी झालेल्या क्षेत्राचे near-real-time monitoring करण्याच्या पद्धतीवरही काम केले आहे. भविष्यात अशा उपग्रहांच्या मदतीने प्रशासनाला मोठ्या क्षेत्रा तील पिकांची परिस्थिती समजून घेणे, दुष्काळ किंवा अतिवृष्टीचा परिणाम ओळखणे आणि कृषी नियोजन अधिक अचूकपणे करण्यास मदत होऊ शकते.


पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात महत्त्वाची मदत
भारतामध्ये दरवर्षी पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, जंगलातील आग आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. अशा वेळी जमिनीवरून प्रत्येक ठिकाणाची माहिती मिळवणे अवघड असते. उपग्रह मात्र मोठ्या भागाचे एकाच वेळी निरीक्षण करू शकतो.पूर आल्यास पूरग्रस्त क्षेत्राचा विस्तार, पाण्याची दिशा आणि बाधित भागांचे नकाशे तयार करण्यासाठी satellite data वापरता येतो.


हवामान आणि पर्यावरणाच्या अभ्यासाला मदत
EOS-05 हा मुख्यतः Earth Observation satellite आहे. त्यामुळे तो INSAT- 3D/3DSसारखा मुख्य हवामान उपग्रह नसला, तरी पृथ्वीवरील मोठ्या क्षेत्राचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांच्या समूहात त्याचे महत्त्व आहे. जमिनीवरील बदल, नैसर्गिक संसाधने, पर्यावरणीय स्थिती आणि आपत्तींचे परिणाम समजून घेण्यासाठी Earth Observation dataचा उपयोग होतो.


राष्ट्रीय सुरक्षेसाठीही उपयुक्त माहिती
Earth Observation satellite मधून मिळणारी भू-अवलोकनाची माहिती राष्ट्रीय नियोजन आणि विविध रणनीतिक उपयोगांसाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र EOS-05ला अधिकृतरीत्या ‘स्पाय सॅटेलाइट’ म्हणून वर्णन करण्यापेक्षा त्याला अत्याधुनिक Earth Observation satellite म्हणणे अधिक अचूक आहे. उच्च वारंवारतेने मोठ्या क्षेत्राचे imaging करण्याची क्षमता देशाच्या भू-अवलोकन आणि निर्णयक्षमतेला बळ देऊ शकते.

EOS-05ला अंतराळात पोहोचवण्याची जबाबदारी GSLV-F17 या रॉकेटवर आहे. हे GSLVचे १९वे उड्डाण आहेGSLV Mk II हे तीन टप्प्यांचे launch vehicle आहे. त्याला चार liquid strap-on boosters असून तिसऱ्या टप्प्यात भारतीय CE-7.5 cryogenic engine वापरले जाते. हे इंजिन Liquid Hydrogen आणि Liquid Oxygenचा वापर करते. GSLV-F17मध्ये ४ मीटर व्यासाचे Ogive composite payload fairing वापरण्यात आले आहे. हे fairing वातावरणातून रॉकेट जात असताना उपग्रहाचे संरक्षण करते. ISROच्या अधिकृत मिशन ब्रोशरनुसार या मोहिमेतील EOS-05चे payload mass सुमारे 2,367 किलो आहे.


अंतराळ झेप
भारताने गेल्या काही दशकांत पृथ्वी निरीक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्षमता विकसित केली आहे. IRS मालिकेपासून EOS मालिकेपर्यंत अनेक उपग्रहांच्या माध्यमातून शेती, जलसंपदा, पर्यावरण, शहरी विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर क्षेत्रांसाठी उपग्रह माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.


EOS-05 मोहिमेचे वैशिष्ट्य मात्र त्याच्या Geosynchronous orbitमधून imaging क्षमतेत आहे. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर वारंवार नजर ठेवण्याच्या भारताच्या क्षमतेत महत्त्वाची भर पडू शकते. ४ सप्टेंबरच्या पहाटे श्रीहरिकोटावरून होणारे हे प्रक्षेपण त्यामुळे केवळ आणखी एक रॉकेट लॉन्च नसून भारताच्या Earth Observation क्षमतेच्या पुढील टप्प्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.ISROच्या अधिकृत माहितीनुसार प्रक्षेपण ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:५५ वाजता नियोजित आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख