‘लोकायन २०२६’ ही १० महिन्यांची ट्रान्सओशनिक मोहीम असून INS Sudarshini या काळात २२,००० हून अधिक नॉटिकल मैलांचा प्रवास करत १३ देशांमधील १८ परदेशी बंदरांना भेट देत आहे. या मोहिमेत भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलातील २०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना दीर्घ पल्ल्याचे नौकानयन, समुद्री मार्गदर्शन आणि पारंपरिक ‘सीमनशिप’चे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळत आहे
भारतीय नौदलाची ‘सेल ट्रेनिंग शिप’ (शिडाची प्रशिक्षण नौका) असलेली ‘आयएनएस सुदर्शनी’ (INS Sudarshini), तिच्या ‘लोकायन २६’ (Lokayan 26) या महासागरीय मोहिमेचा भाग म्हणून १ सप्टेंबर २०२६ रोजी स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचली.
बार्सिलोना येथील मुक्कामादरम्यान, ही नौका स्पॅनिश नौदल आणि सागरी क्षेत्रातील इतर संबंधित घटकांसोबत व्यावसायिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होईल. या मोहिमेवर असलेले सागरी प्रशिक्षार्थी व्यावसायिक संवाद आणि नौकानयन कौशल्यांच्या (seamanship) देवाणघेवाणीमध्ये सहभागी होतील.
४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आयएनएस सुदर्शनी’ अभ्यागतांसाठी खुली असेल; याद्वारे भारताच्या सागरी परंपरा आणि नौदलाच्या शोधमोहिमेची भावना अनुभवण्याची संधी मिळेल.
ही मोहीम भारताच्या सागरी उपक्रमांचे प्रतीक आहे. ती जागतिक सागरी घडामोडींमधील भारताचे महत्त्व, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आणि महासागरीय नौकानयन मोहिमांमधील उत्कृष्टतेप्रती भारतीय नौदलाची कटिबद्धता अधोरेखित करते.
स्पेनसोबत सागरी सहकार्याला चालना
बार्सिलोना मुक्कामादरम्यान INS Sudarshini वरील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी स्पॅनिश नौदल तसेच अन्य सागरी क्षेत्रातील भागीदारांशी व्यावसायिक व सांस्कृतिक संवाद साधणार आहेत. प्रशिक्षणार्थी विविध सागरी अनुभवांची देवाणघेवाण करणार असून, या माध्यमातून दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य आणि परस्पर समज अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे
बार्सिलोना येथे ४ सप्टेंबर रोजी INS Sudarshini नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार असून, भारतीय सागरी परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.