प्रार्थना ही मानवी मनाची नाजूक आणि पवित्र भावना असते. माणूस जेव्हा हतबल होतो, तेव्हा तो देवाचा धावा करतो. संकटात सापडलेला माणूस डोळे मिटून हात जोडतो. त्यातून त्याला एक मोठी अदृश्य ताकद मिळते. प्रार्थना माणसाला जीवन जगण्याची नवी उमेद देते. ईश्वरावरील श्रद्धा माणसाला संकटाशी लढायला शिकवते. पण जगातील सगळ्याच प्रार्थना अशा नसतात. काही प्रार्थना अतिशय क्रूर हेतूने केल्या जातात. काही दिवसांपूर्वी जिहादी मनोवृत्तीचा दहशतवादी वैमानिक हमाम अल-हम्मामी याने भारतीय वैमानिक असणारा कॅप्टन स्मित मच्छारा यांच्यावर उडत्या विमानात पाठीमागून प्राणघातक हल्ला केला. हा जीवघेणा हल्ला करण्यापूर्वी तो अल्लाची प्रार्थना करत होता. आणि प्रत्यक्ष हल्ला करताना त्याच्या तोंडी ‘अल्ला हू अकबर’ हे शब्द होते. त्याच्या धर्मातल्या देवाचे नाव घेऊन तो एका माणसाचा जीव घ्यायला निघाला होता. इतकेच नाही तर त्यामुळे १७४ प्रवाशांचे प्राण जाणार होते. तसेच, हे विमान जर एखाद्या इमारतीवर कोसळले असते तर तिथेही शेकडो निष्पाप नागरिका मारले गेले असते. थोडक्यात, हमाम अल-हम्मामी याला अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती घडवायची होती. त्याचा उद्देश केवळ स्मित यांना मारण्याचा नव्हता. त्याला १७४ प्रवाशांचा बळी घ्यायचा होता. विनाशकारी वृत्तीची आणि क्रूरतेची ही परिसीमा होती. कोणताही करुणामय देव कोणाला मारण्याची शिकवण देतो काय? पण हमामच्या डोक्यात जिहादी इस्लामचे विष भरले होते. आता त्याच्या चौकशीतही त्याने आपल्याला सगळ्यांना मारूनच टाकायचे होते, हे स्पष्टच सांगितले आहे. त्याचे जिहादी प्रशिक्षण झालेले असल्याने त्याला मृत्यूची भीती वाटत नसावी, यात काही विशेष नाही. मात्र, हमाम अल-हम्मामी असा क्रूर खेळ करीत असताना त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक वेगळेच चित्र होते. कॅप्टन स्मित हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होते. वेदना असह्य होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. ते १७४ निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावत होते. या अभूतपूर्व संघर्षाच्या वेळी त्यांच्याही ओठांवर एक प्रार्थना होती. ते सलग ‘हनुमान चालिसा’ म्हणत होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलताना कॅप्टन स्मित यांनी ही माहिती दिली. एकाच जागी आणि एकाच वेळी दोन वेगवेगळ्या माणसांच्या ओठांवर प्रार्थना होती. पण त्या दोन प्रार्थनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता. एका प्रार्थनेत रक्ताची तहान होती. तर दुसऱ्या प्रार्थनेत जीवदान देण्याची ओढ होती. एका प्रार्थनेत द्वेष होता, तर दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेवण्याची धडपड होती.
विध्वंस आणि सृजनाचा लढा
दोन प्रार्थनांमधला आणि त्यांच्या उद्देशातला हा फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हमामची प्रार्थना विद्ध्वंस घडविण्यासाठी होती. ती निष्पाप आणि नि:शस्त्र माणसांना मारून टाकण्यासाठी होती. अल्लाचे नाव घेऊन रक्ताचे पाट वाहविण्याची ही विकृत मानसिकता आहे. दुसरीकडे कॅप्टन स्मित यांची मंगलमय हिंदू प्रार्थना होती. ती स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविण्यासाठी होती. एका प्रार्थनेत मृत्यूचा भयंकर, क्रूर अंधार होता. दुसऱ्या प्रार्थनेत जीवनाचा तेजस्वी प्रकाश होता. मुस्लिम धर्माच्या आणि जिहादच्या नावाखाली जेव्हा हातात शस्त्र घेतले जाते, तेव्हा मूळ प्रार्थनेचा खरा अर्थच नष्ट होतो. कट्टरतावाद माणसाला पूर्णपणे आंधळा करून सोडतो. तो त्याला विवेक शून्याच्या गर्तेत ढकलतो. जिहादी वृत्तीमुळे माणसातील माणुसकी कायमची संपते. दुसऱ्याला मारण्यात आणि स्वतः मरण पत्करण्यात या दहशतवाद्यांना स्वर्ग दिसतो. निष्पाप जीवांचा बळी घेणे हे त्यांना अल्लाची खिदमत वाटते. ही अत्यंत घातक आणि विकृत विचारसरणी आहे. जगाला त्यापासून वाचवायला हवे आहे. कॅप्टन स्मित यांचा पराक्रम म्हणजे या इस्लामी जिहादी विचारसरणीला दिलेले चोख उत्तर आहे. स्मित यांनी या संकटात आपल्या आराध्य दैवताचे स्मरण केले. ते स्मरण त्यांना लढण्याचे बळ देणारे ठरले. मुख्य म्हणजे, ही प्रार्थना सर्वांचे प्राण वाचावेत, यासाठी होते. प्राण घेण्यासाठी नव्हती. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांनी इतरांचा विचार केला. स्वतःचे रक्त सांडून इतरांना वाचवणे हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी प्रार्थना आहे, हे त्यांनी दाखवून दिले. कॅप्टन स्मित हिंदू धर्माचे जे काही तत्त्वज्ञान शिकले असतील किंवा त्यांच्यात ते मुरले असेल, त्याचा अर्थ हा असा करुणेचा होता. तो त्यांनी कर्तव्य आणि कृतीतून दाखवून दिला. हा लढा केवळ दोन माणसांमधला नव्हता. हा लढा विध्वंस आणि सृजन यांच्यातील होता. हा लढा क्रूरता आणि माणुसकी यांच्यातला होता. जिहादी मानसिकतेने नेहमीच मानवतेचा गळा घोटला आहे. पण कॅप्टन स्मित यांच्यासारखी माणसे अशा अंधारातही आशेचा किरण बनून उभी राहतात. त्यांची कृती मानवतेला नेहमीच प्रेरणा देणारी ठरते. स्मित यांच्यावरचे संस्कार अशावेळी जागे झाले. ते त्यांना त्यांच्या घरातून मिळाले. हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे हेच मानवतेला योगदान आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती आणि धडा
या ताज्या घटनेतून अनेक गंभीर गोष्टींवर प्रकाश पडतो. या गोष्टी आपण बारकाईने आणि गांभीर्याने पाहिल्या पाहिजेत. त्या नीट न्याहाळल्या नाहीत, तर इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. आपण डोळ्यांवर पट्टी बांधून वावरू शकत नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. इतिहासाची पाने अशा रक्ताने माखलेली आहेत. मुंबईवरील २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला आपण कधीही विसरू शकत नाही. त्यावेळीही अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. त्या हल्लेखोरांच्या मनातही हीच विषारी शिकवण पेरलेली होती. कसाबसारखे तरुण याच जिहादी मानसिकतेचे बळी होते. न्यू यॉर्कमधील ट्विन टॉवरवर झालेला हल्ला असो वा युरोपमधील विविध शहरांतील बॉम्बस्फोट असोत. सगळीकडे एकच सूत्र दिसते. जिहादी इस्लामी वृत्तीने नेहमीच मानवतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. गेल्या वर्षी इस्रायलमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेला भीषण हल्ला याच इस्लामी कट्टरवादाचा परिपाक होता. तिथेही निष्पाप नागरिक, महिला आणि लहान मुले यांना क्रूरपणे लक्ष्य करण्यात आले. निष्पाप लोकांचे रक्त सांडून हे लोक कसला धर्म पाळतात? या जिहादी वृत्तीला आणि कडव्या इस्लामला वेळीच ठेचले नाही, तर भविष्यात आणखी भयानक संकटे उभी राहतील. इतिहासातून धडा न घेणारी राष्ट्रे आणि समाज कायमचे नष्ट होतात, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे म्हणणे आता पुरेसे नाही. कारण हल्लेखोर स्वतःच आपल्या धर्माचे नाव घेऊन हल्ले करत आहेत. या वास्तवाकडे पाठ फिरवणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
भारत आणि इस्रायलची समान वेदना
या घटनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भारत आणि इस्रायल यांची मैत्री. ही ताजी घटना इस्रायल आणि भारत यांच्या मैत्रीचा अध्याय आणखी पुढे नेणारी आहे. दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यांचा आजचा संघर्ष खूप सारखा आहे. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी दशकानुदशके इस्लामी दहशतवादाच्या आणि कट्टरतावादाच्या झळा सोसल्या आहेत. शेजारील राष्ट्रांकडून आणि छुप्या शत्रूंकडून होणारे हल्ले दोन्ही देशांनी सातत्याने परतवून लावले आहेत. दोन्ही देश आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने लढत आहेत. हमामने केलेला हल्ला आणि त्याला कॅप्टन स्मित यांनी दिलेले चोख उत्तर हा याच जागतिक संघर्षाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या घटनेने दोन्ही देशांमधील भावनिक आणि राजनैतिक बंध अधिक घट्ट केले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या दोन समविचारी देशांना आता अधिक खंबीरपणे एकत्र उभे राहावे लागेल. जागतिक मंचावर जेव्हा अशी विकृत मानसिकता डोके वर काढते, तेव्हा तिला चिरडून टाकण्यासाठी भक्कम एकजूट दाखवणेच आवश्यक असते. भारताने वेळोवेळी इस्रायलला आपला भक्कम पाठिंबा दिला आहे. इस्रायलनेही संकटाच्या काळात भारताच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका नेहमीच निभावली आहे. सामायिक वेदनेतून निर्माण झालेली ही मैत्री केवळ राजकीय नाही. ती संस्कृती आणि मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र आलेली एक मोठी ताकद आहे. तंत्रज्ञान आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करून ही ताकद अधिक वाढवण्याची गरज आहे.
भविष्यातील निर्णायक संघर्ष
भविष्यात आपल्याला अनेक कठीण आव्हानांचा सामना करायचा आहे. ही लढाई आता केवळ सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती समाजात, विचारात आणि घराघरात पोहोचली आहे. हिंदू आणि ज्यू या दोन्ही संस्कृती अतिशय प्राचीन आहेत. त्यांनी अनेक आक्रमणे पचवली आहेत. पण आता भविष्यात एकत्रितपणे एक मोठी लढाई लढावी लागणार आहे, याचेच हे स्पष्ट सूचन आहे. कट्टर इस्लाम आणि जिहादी प्रवृत्ती यांच्याकडून येणारा धोका आता लपून राहिलेला नाही. जागतिक शांततेला सर्वात मोठा धोका याच प्रवृत्तीतून निर्माण झाला आहे. या लढाईत केवळ शस्त्रांची ताकद पुरेशी नाही. आपल्याला वैचारिक पातळीवरही कडक प्रहार करावे लागतील. दोन प्रार्थनांमधला हा फरक आपल्याला जगाला ओरडून आणि वारंवार सांगावा लागेल. एकीकडे सगळ्यांना घातले जाणारे मृत्यूचे भय आहे आणि दुसरीकडे जीवनाची आकांक्षा, उमेद आहे. कॅप्टन स्मित यांनी आपल्या अभूतपूर्व शौर्यातून आणि श्रद्धेतून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी दाखवलेली हिंमत आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी आहे. कडव्या इस्लामला आणि त्याच्या हिंस्र शिकवणुकीला कोणत्याही परिस्थितीत थारा देता कामा नये. जो समाज अशा कट्टरतेला खतपाणी घालतो, त्याचाही स्पष्ट शब्दांत निषेध झाला पाहिजे. मानवतेचा आणि राष्ट्रीयत्वाचा धर्म जपणे ही आजच्या काळाची सर्वांत मोठी गरज आहे. ही घटना केवळ एक वीरवृत्तीची बातमी नाही. तो धोक्याचा इशारा आहे. हा इशारा वेळीच समजून आपण तयारी केली पाहिजे. ज्यू आणि हिंदू यांनी या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट बांधली पाहिजे. तरच आपण येणाऱ्या पिढ्यांना एक सुरक्षित आणि शांततामय भविष्य देऊ शकू. इतिहासाच्या या वळणावर आपली भूमिका निर्णायक ठरणार आहे. ती पार पाडण्यात आपण कमी पडलो, तर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. कॅप्टन स्मित मच्छार यांनी या धडा आपल्याला त्यांच्या अजोड शौर्यातून शिकविला आहे…