अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेला एकदिवसीय लाक्षणिक संप तसेच आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दि. २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर संघटनेने दि. ६ ऑक्टोबर रोजीचा प्रस्तावित संप व मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
सरकारच्या या सकारात्मक भूमिकेनंतर, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन’ने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेला एक दिवसाचा सांकेतिक संप आणि आझाद मैदानावर काढण्यात येणारा प्रस्तावित मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे; त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविकांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे आणि संवाद व सहकार्यातून यावर नक्कीच योग्य तोडगा काढला जाईल. याप्रसंगी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव आणि विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.