Wednesday, January 21, 2026

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

Share

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत ‘महाविकास आघाडी’ला नाकारले असले, तरी दुसऱ्या बाजूला या निवडणुकांमधून समोर आलेले एक भयावह चित्र राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात कट्टरपंथी मुस्लिम पक्षांचा आणि उमेदवारांचा झालेला उदय हा केवळ योगायोग नसून एका नियोजित राजकीय ध्रुवीकरणाचा भाग असल्याचे दिसून येत आहे.

एमआयएमची जोरदार मुसंडी आणि ‘हिरव्या पट्ट्यांचे’ राजकारण

निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास एआयएमआयएम (MIM) ने राज्यभरात १२६ हून अधिक जागा जिंकून आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली आहे. मुंबई, सोलापूर, संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कट्टरपंथी उमेदवारांनी मिळवलेला विजय हा राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विजय मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी उघडपणे ‘जिहादी’ विचारसरणीचा आणि द्वेषपूर्ण भाषणांचा प्रचार सुरू झाला आहे. नागपूर आणि मुंब्रा येथे विजयी उमेदवारांनी मुस्लिमबहुल भागांत ‘हिरवे पट्टे’ निर्माण करण्याची आणि हिंदू समाजाला छद्मरीतीने धमकावणारी विधाने केल्याचे समोर आले आहे.

मुंब्रा आणि नागपूर: सत्तेचा उन्माद की लोकशाहीला आव्हान?

ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेली सर्वात तरुण नगरसेविका सहर युनूस शेख हिने आपल्या पहिल्याच भाषणात जहरी वक्तव्ये केली. “संपूर्ण मुंब्रा अशा हिरव्या रंगात रंगवायचा आहे की विरोधकांना धूळ चारली जाईल,” असे म्हणत तिने मराठी अस्मिता आणि हिंदू समाजाविरोधात उघड भूमिका मांडली.

असाच प्रकार नागपुरात पाहायला मिळाला. २०२५ मधील नागपूर दंगलीचा आरोपी फहीम खान याची पत्नी अलीशा खान हिला एमआयएमने उमेदवारी दिली होती. ती निवडून येताच फहीम खानने चक्क सरकारलाच आव्हान दिले. “एका फहीमला अटक केली तर सहा लीडर निवडून आलेत,” असे म्हणत त्याने ‘बुलडोझर राजकारणा’ला थेट उत्तर देण्याची भाषा केली. दंगलखोरांना मिळणारे हे राजकीय बळ राज्याच्या सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकते.

राज्यातील १२ महानगरपालिकांमध्ये ओवैसी बंधूंच्या पक्षाने शिरकाव केला आहे. त्याचे शहरनिहाय आकडे खालीलप्रमाणे आहेत:

शहरएमआयएम नगरसेवक संख्या
छत्रपती संभाजीनगर३३
मालेगाव२१
नांदेड१४
अमरावती१२
धुळे१०
सोलापूर०८
मुंबई०७

याव्यतिरिक्त सोलापूर आणि नांदेडमध्ये एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे, ही बाब राज्याच्या राजकारणात होत असलेला मोठा बदल दर्शवते.

एकगठ्ठा मतदानाचे परिणाम

या निकालांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम मतदारांनी केलेले गठ्ठा मतदान’. मालेगावमध्ये तर स्थानिक इस्लाम पार्टी (३५ जागा) आणि एमआयएम (२१ जागा) यांनी मिळून संपूर्ण महापालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. केवळ एमआयएमच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांकडूनही निवडून आलेले मुस्लिम उमेदवार हे कट्टरपंथी विचारांना खतपाणी घालणारे आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुंबईत निवडून आलेल्या २९ मुस्लिम नगरसेवकांपैकी अनेकांची पार्श्वभूमी हीच चिंता वाढवणारी आहे.

विकासाच्या मुद्द्यावर भाजपने मिळवलेले यश स्वागतार्ह असले तरी, स्थानिक पातळीवर फोफावत असलेली ही कट्टरतावादी प्रवृत्ती भविष्यात सामाजिक संघर्षाला आमंत्रण देणारी ठरू शकते. लोकशाहीत मतांचे राजकारण करताना राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख