Thursday, October 15, 2026

लोणावळ्यात रंगणार ‘निवासी संगीत संमेलन’

Share


अभिजात म्युझिक फोरमच्या वतीने ‘लोणावळा-खंडाळा संगीत संमेलन २०२६’

पुणे/लोणावळा : भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ‘अभिजात म्युझिक फोरम, मुंबई’च्या वतीने यंदाचे ‘लोणावळा–खंडाळा संगीत संमेलन २०२६’ (LKSS.26) आयोजित करण्यात आले आहे. हा आगळावेगळा निवासी संगीत सोहळा १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लोणावळा येथील ‘महाराजा अग्रसेन पॅलेस’ येथे पार पडणार आहे.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी
या तीन दिवसीय संमेलनात गायन, वादन आणि शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा वेध घेतला जाणार आहे. यामध्ये पं. उदय भवाळकर, पं. योगेश सामसी, विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर आणि विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यासह देशभरातील अनेक नामवंत व युवा कलाकार आपली कला सादर करणार आहेत. नव्या पिढीत शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे आणि युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
निवासी स्वरूपात मैफल
कलाकार आणि रसिक यांनी एकत्र राहून संगीताचा आस्वाद घेणे, हे या निवासी संमेलनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे संमेलन निवडक रसिकांसाठी आयोजित करण्यात आले असून, यात निवास, भोजन आणि सलग तीन दिवस दर्जेदार संगीताचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. प्रवेशिकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.

महोत्सवाचे वेळापत्रक
संमेलनाची आखणी खालीलप्रमाणे विविध सत्रांमध्ये करण्यात आली आहे:
• १३ नोव्हेंबर: सायंकाळी ५ ते ८ आणि रात्री ९ ते ११
• १४ नोव्हेंबर: सकाळी ६.३० ते ८, सकाळी ९ ते १२, सायंकाळी ४ ते ८ आणि रात्री ९ ते ११
• १५ नोव्हेंबर: सकाळी ८ ते दुपारी १२
‘अभिजात म्युझिक फोरम’ गेल्या दशकभरापासून शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी कार्यरत असून, यापूर्वी मुंबईसह गोवा, वाराणसी, ऋषिकेश, अयोध्या आदी ठिकाणी त्यांनी यशस्वी उपक्रम राबवले आहेत. शास्त्रीय संगीताच्या रसिकांनी या अनोख्या निवासी अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संपर्क : केशव परांजपे : 77386 74321

अन्य लेख

संबंधित लेख