Monday, August 24, 2026

केशव सृष्टीची शैक्षणिक सहल आणि रईस शेख यांची तगमग 

Share

मुंबई महापालिकेने ७ वीच्या विद्यार्थ्यांची भाईंदरच्या उत्तनमधील ‘केशव सृष्टी’ येथे पर्यावरणीय सहल नेण्याच्या २ कोटी ४६ लाखांच्या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे…

केशव सृष्टी ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असल्यामुळे अशा वैचारिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल नेणे म्हणजे शिक्षणाचे “भगवेकरण” असल्याचा आरोप करत… भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे पालिकेने अशा एकाच बाजूची वैचारिक किंवा धार्मिक उद्दिष्टे असलेल्या संस्थेला सार्वजनिक निधीतून सहलीसाठी निवडणे अयोग्य व घटनाविरोधी असल्याचे सांगत त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे…

मुंबई व महाराष्ट्रात पर्यावरण शिक्षणासाठी अनेक विशेष संस्था (उदा. BNHS, महाराष्ट्र नेचर पार्क इ.) असताना केवळ एकाच संस्थेची निवड का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस पक्षाने केला आहे… तसेच प्रस्तावात ‘मोनोपोली’ (एकटीव अधिकार) आणि कंत्राट प्रक्रियेत शिथिलता आणल्याबद्दलही शंका उपस्थित केली आहे…

भाईंदरच्या उत्तन येथे समुद्रकिनाऱ्यालगत १५० एकराहून अधिक असलेल्या आणि वनश्रीने नटलेल्या नितांत रमणीय स्थानी “केशवसृष्टी” हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने १९८२ मध्ये सुरू झालेला सामाजिक उपक्रम आहे… मुंबईचे डॉ. शरदचंद्र अजिंक्य यांनी राष्ट्रनिर्माणासाठी ही जमीन दान केली होती…

आजमितीस या कॅम्पसमध्ये ३,१०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आणि २२ एकरांवर पसरलेल्या भागात ५०० हून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती (वनौषधी) आहेत… त्यावर संशोधन करून या वनस्पतींपासून वनौषधी तयार केल्या जातात…

येथील तलाव हा हेरिटेज साईट म्हणून नोंदवला गेला आहे…

त्याचप्रमाणे येथे कृषी संशोधन केंद्र देखील आहे… सेंद्रिय शेतीचे अनेकविध प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते…

प्लॅस्टिक कचऱ्याचे पुनर्चक्रण करून बाकड्यांची व पेव्हर ब्लॉकची निर्मिती यांसारखे वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत आदर्श उपक्रम येथे राबवले जातात…

सौर चूूल (Solar Cooker) वापराचा प्रसार करण्यासाठी आणि जगातील सर्वात मोठ्या सौर पाककला सत्रासाठी या संस्थेच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे…

येथे Keshav Srushti Nature And Adventure Centre द्वारे पर्यावरण व साहसी पर्यटन चालवले जाते…

इंटरनेट सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शैक्षणिक पुस्तके पोहोचावीत, म्हणून ११०० हून अधिक पुस्तकांचे फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे… यात प्रशिक्षित शिक्षक मुलांच्या शिक्षणात मदत करतात…

वनवासी भागातील महिलांना व कुटुंबांना बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते… पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील तेतवली गावात या माध्यमातून सुमारे ९० प्रकारच्या वस्तू तयार केल्या जात आहेत…

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी गावकऱ्यांच्या सहभागातून गावाची माहिती, भूगोल आणिसंकल्पांवर आधारित ‘गाव आराखडा’ तयार करून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते…

संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते आणि संवर्धन केले जाते…

स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती तर शेण व इतर सेंद्रिय पदार्थांपासून गॅस तयार केला जातो…  ओल्या कचऱ्याचा वापर करून शेतीसाठी उपयुक्त असे गांडुळ खत (Vermicomposting) तर कागद आणि प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्या योग्य बनवले जाते…

केशव सृष्टीची गोशाळा तर नजर लागण्यासारखी आहे… देशी गाई व बैलांची येथे विशेष काळजी घेतली जाते… गोसेवा, गोवंश संरक्षण आणि शेतीसाठी आवश्यक गोबर-गोमूत्राचा योग्य वापर याद्वारे केला जातो…

या शैक्षणिक सहलीत पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन, वनौषधी, ग्रामविकास, गोशाळा आणि सामाजिक बांधिलकी असे अनेक प्रकल्प महापालिकेच्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आणि तेही मुंबईच्या अगदी जवळ बघायला व अनुभवायला मिळणार आहेत… यात आमदार राईस शेख आणि काँग्रेसला आक्षेपार्ह काय वाटते?…

त्यांचा विरोध हा राजकीय आणि मज़हबी द्वेषातून उद्भवलेला आहे…

भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे पालिकेने अशा एकाच बाजूची वैचारिक किंवा धार्मिक उद्दिष्टे असलेल्या संस्थेला सार्वजनिक निधीतून सहलीसाठी निवडणे अयोग्य व घटनाविरोधी असल्याचे सांगणाऱ्या रईस शेख आणि काँग्रेस यांनी…

१९५२ ते २०१८ अशी तब्बल ६६ वर्षे भारत सरकारने हज सबसिडीवर सरकारी तिजोरीतून लक्षावधी कोटी रुपये खर्च केले… इथपासून…

उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी २०२० मध्ये हाजी अली दर्ग्याच्या सुशोभीकरणासाठी ३५ कोटी रुपयांच्या सरकारी निधीची तरतूद व मान्यता जाहीर करण्यात आली होती…

हा पैसा “धर्मनिरपेक्ष” कारणासाठी खर्च झाला होता का? हे ही सांगावे… म्हणजे जनतेला त्यांची मज़हबी नियत कळेल…

शिवाय केशवसृष्टीतील एका शैक्षणिक सहलीने… तेथील सगळे प्रकल्प बघून… विशेषतः गोशाळा बघून सहलीला गेलेले सर्व विद्यार्थी संघाचे स्वयंसेवक होतील अशी भिती त्यांना वाटत असावी…

जर अशी भिती त्यांना खरंच वाटत असेल तर ते त्यांचे घोर अज्ञान आहे…

स्वयंसेवक घडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची “दैनंदिन शाखा” नावाची स्वतंत्र व्यवस्था आहे…

शैक्षणिक सहली काढून स्वयंसेवक घडले असते तर आज संघाला अपरंपार कष्ट घेऊन “दैनंदिन शाखा” नावाची व्यवस्था चालवण्याची गरजच उरली नसती…

आज देशाच्या राष्ट्रपतींपासून पंतप्रधान, गृहमंत्री ते राज्याच्या मुख्यमंत्री व केंद्र तसेच राज्य मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा अभिमानाने सांगणारे आहेत… भारताच्या जनतेला गेली १०० वर्षे संघाची ओळख “सर्वसामान्य समाजातील देशभक्ती जागृत करणारी सांस्कृतिक संघटना” अशीच आहे…

मग रईस शेख आणि काँग्रेस यांचा नेमका आक्षेप कशाला आहे?… बहुदा तो या देशातील सर्वसामान्य समाजाची देशभक्ती जागृत होण्याला असावा…

कारण या देशातील  सर्वसामान्य समाजाची देशभक्ती जागृत झाली तर आपली मज़हबी द्वेषाची राजकीय दुकानदारी बंद होईल अशी त्यांना भिती वाटत असावी…

आणि ती भिती खरी देखील आहे म्हणा…

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या हिंदू द्वेषाच्या तसेच मुस्लिम लांगूलचालनाच्या राजकारणाची तीच नियती आहे…

अन्य लेख

संबंधित लेख