२७ वर्षीय बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम घुसखोर महिलेला तिच्या मायदेशी परत पाठवल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच, मुंबईत बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात राहत असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
पिटीआय च्या बातमीनुसार, गिरगाव चौपाटी जवळच्या परिसरात एक संशयित बांगलादेशी महिला फिरत असल्याची माहिती पोलिसांना शनिवारी मिळाल्यावर ही पूर्ण घटना उघडकीस आली असल्याच गावदेवी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.
नादिरा सुलताना असलेली ही मुस्लिम रोहिंग्या पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान, ती तिची ओळख आणि पत्त्याबद्दल स्पष्ट माहिती देऊ शकली नाही. तिची उत्तरे संशयास्पद वाटल्याने, तिला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान पडताळणी करताना तिच्याकडे भारतात राहण्यासाठी तिने सादर केलेली कागदपत्रे प्राथमिक तपासात बनावट असल्याच उघड झाल. त्यानंतर तिची कागदपत्रे आणि मागील नोंदी तपासण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, तपासात असे दिसून आले आहे की सुलतानाला गेल्या महिन्यातच भारतातून बांगलादेशला हद्दपार करण्यात आल होत.
पोलिसांनी या बेकायदेशीर घुसखोरांवर फास आवळत गुन्हे शाखेच्या स्थानिक पोलीस ठाण्यांसह विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ५००हून अधिक बांगलादेशी रोहिंग्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी नियमित केलेल्या या मोहिमांद्वारे ते घुसखोरांवर पाळत ठेवून आहेत.
बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागद पत्रे म्हणजेच आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीचाही शोध पोलीस घेत आहेत. ह्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्या भारताच्या अनेक ठिकाणी राहतात.
मागील पोलिसांद्वारे केलेल्या कारवाई मध्ये मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्ट वापरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे बेकायदा प्रवेशासोबतच बनावट कागदपत्रांचे नेटवर्क आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींचाही तपास सुरू आहे.
मुंबईच्या विविध भागातिल कारवाई मध्ये मालाड, वर्सोवा, अंधेरी, कामाठीपुरा, धारावी, घाटकोपर, बोरिवली तसेच मुंबई विमानतळ परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी जूनमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. हे दीर्घकाळापासून भारतात बेकायदा राहत असल्याचा आरोप आहे. कामाठीपुरा परिसरातही बांगलादेशी महिलांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत १,८०० जणांना ताब्यात घेण्यात आले असून यावर्षी ऑगस्ट २०२६ पर्यंत ५०० जणांना अटक केली आहे. या कारवाई अंतर्गत त्यापैकी १,२३८ जणांना हद्दपार करण्यात आले होते. उर्वरित प्रकरण ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने प्रलंबित आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली.
बरेच बांगलादेशी घुसखोर मागील अनेक वर्ष भारतात ओळख बदलून राहत आहेत मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडतात विविध गोपनीय माहिती समोर येत आहे. या घुसखोरांना वरदहस्त असल्याशिवाय भारतामध्ये प्रवेश मिळणं शक्य नाही. दिल्लीच्या कालींजी कुंज, वसंत कुंज, रंगपुरी, रूची बिहार येथे यांचं वास्तव्य आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस कागदपत्र बनवणाऱ्या टोळ्याचे दर ही ठरलेले आहेत.
बनावट आधार कार्ड – ५,००० ते १०,००० रुपये
बनावट रेशन कार्ड – ५,००० ते १०,००० रुपये
बनावट महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र – १०,००० ते १५,०००रुपये
बनावट पॅन कार्ड – ५,००० ते १०,००० रुपये
बनावट पासपोर्ट – ५०,००० ते एक लाख रुपये
हे बोगस कागदपत्रांचे दर आहेत.
पकडलेल्या बांगलादेशी घुसकरांकडून सापडलेले मोबाईल यावरून ढाकाचं कनेक्शन समोर आला आहे. फोन रेकॉर्ड मधून व्हाट्सअप कॉलिंग, फेसबुक कॉलिंग आणि विविध सोशल मीडिया ॲप्स मधून हे बांगलादेशी घुसखोर नातेवाईकांशी संपर्कात असतात. मुंबईसह महाराष्ट्र सरकारने नाशिक, अमरावती जिल्ह्यातही दोन एसआयटी बनवल्या आहेत.
लोकमत मधील बातमीनुसार नवी मुंबई, पनवेल, नेरूळ, उरण या परिसरातही बारा ते पंधरा हजार घुसखोर आढळले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असली तरी पोलीस या सर्व प्रकाराकडे विशेष लक्ष ठेऊन आहेत. बनावट कागद पत्र बनविणारी टोळी, त्यामध्ये सुद्धा पासपोर्ट सारखे अति महत्त्वाचे कागदपत्र बनवून मिळतात हे धोकादायक आहे. परंतु यामध्ये कोणाकोणाचे वरदहस्त आहेत हे शोधून काढणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण राजकीय हस्तक्षेप झाल्याशिवाय हे बांगला देशी रोहिंग्या भारतात पर्यायाने मुंबईत येणं शक्य नाही. त्याच प्रमाणे हे रोहिंग्या भारतात आल्यावर या रोहिंग्या कडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि अशा सारख्या अजून कोणकोणत्या देश विरोधी कारवाया चालू आहेत हे पोलीस तपासणीत उघड होईलच.