Tuesday, January 28, 2025

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास

Share

डोंबिवलीत (Dombivali) कमळच फुलणार…असा विश्वास रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळालं अशी प्रांजळ प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, आदी सभासद उपस्थित होते.

शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रामनगर मधील राजस्थान जैन संघ हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल इ. संस्था यांचा सहभाग होता. त्या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधला तसेच त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या

अन्य लेख

संबंधित लेख