Saturday, September 12, 2026

तरुणाईचा जल्लोष व सर्जनशीलता –  रंग २०२६

Share

भारत हा अनेक परंपरांनी, संस्कृतींनी आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला देश आहे. या सदैव तरुण असलेल्या देशाने जगाला अनेक आयाम दिले. ही आयाम देणारी तेजस्वी तरुणाई आपल्या देशाला यशाच्या अनेक शिखरांवर नेऊन ठेवते. आज या तरुणाईला GenZ आणि Gen Alpha (तरुण होत असलेली पिढी) म्हणून जरी ओळखत असले, तरीही ही तरुणाईचं भारताची खरी ओळख आहे. तेव्हा या तरुणाई कडे असलेले अंगभूत गुण जगासमोर ठेवण्यासाठी ’ रंग ‘ हे व्यासापीठ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी ‘रंग २०२६’ (RANG 2026) हे व्यासपीठ तरुणाई साठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवते. त्यातील तरुणाई मध्ये साकारत असलेली गुण प्रामाण्य जगाला दाखविण्यासाठी हे व्यासपीठ एक स्पर्धा आयोजित करते. ही स्पर्धा नसून भारताचा समृद्ध वारसा तरुणाईकडून जगासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्यामुळे तरुणाईची नाळ या भारतीय संस्कृतीशी, त्याच्या परंपरांशी कशी जोडली आहे, याचा परामर्श घेते.

पारंपारिक चौकटीकडून अनुभवसिद्ध  शिक्षणाकडे

भारतात सद्य स्थितीत तरुणाईसाठी उपलब्ध असलेले उपक्रम, यांच्या वैचारिक चौकटी बाहेर जाऊन एक सर्जनशील तरुणांचा शोध घेण्याचा या संस्थेचा संकल्प आहे. भारतीय तरुणांची कलात्मकता आणि साहित्यिक अभिव्यक्ती राष्ट्रीय व्यासपीठावरून मांडत असताना हा प्रवास सातत्याने विस्तारतो आहे व  आज तो देशातील शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांना सोबत घेऊन अव्याहतपणे चालू आहे.

आज, ५ व्या वर्षात पदार्पण करताना, रंग संस्था  हा प्रवास “ रंग भारताचे : साकारणार महोत्सव  सांस्कृतिक वारशाचा आणि पर्यटनाचा ” या संकल्पनेतून साकारत आहे बेधुंद रंगांचा जल्लोत्सव !  यावेळी भारताचे विविध रंग उलगडून बेधुंद उधळण करताना त्याचा प्रवास — भारतातील ऐतिहासिक स्मारके, सांस्कृतिक परंपरा, प्रमुख पर्यटन स्थळे, नैसर्गिक सौंदर्य आणि देशाचा प्रत्येक भाग खास बनवणाऱ्या कथांचा शोध घेण्यासाठी मार्गस्थ होईल.

GenZ ही पिढी केवळ माहिती जमा करणारी तरुणाई नसून ती ‘ मिळणाऱ्या माहितीला जगासमोर मांडणारी तरुणाई ’ आहे.(Content Creators & Storytellers). 

‘रंग २०२६’ च्या “रंग भारताचे : साकारणार महोत्सव  सांस्कृतिक वारशाचा आणि पर्यटनाचा” (Colours of Bharat: Celebrating Heritage & Tourism) ह्या संकल्पनेतून तरुणाईच्या मनाचा ठाव घेता येईल. जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या परिसरातील ऐतिहासिक किल्ल्याला भेट देतो, त्यावर आधारित चित्र रेखाटतो, निबंध लिहितो किंवा ३ मिनिटांचा व्लॉग (Vlog) बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने अनुभवात्मक शिक्षण मिळत. 

‘रंग’चा व्यापक राष्ट्रीय विस्तार

२०२२ मध्ये ‘निर्माण प्रतिष्ठान’, ‘जनता कल्याण केंद्र’ आणि ‘वी वन इव्हेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा आलेख अत्यंत प्रभावी राहिला आहे. पहिल्या वर्षी २ लाख सहभाग्यांपासून सुरू झालेला हा प्रवास, २०२५ पर्यंत ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि २०२६ मध्ये ५ लाख विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचला.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमाने भारतातील सर्व २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपर्यंत १००% भौगोलिक व्याप्ती साध्य केली आहे.

  • पश्चिम भारताची सह्याद्रीची परंपरा,
  • उत्तर भारताचे ऐतिहासिक स्थापत्य ,
  • दक्षिण भारताची भव्य द्रविड मंदिरे , किंवा
  • ईशान्य भारताची समृद्ध निसर्गसंपदा ;

देशाच्या कानाकोपऱ्यातील मुले आपापल्या प्रादेशिक अस्मितेसह या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. ही खऱ्या अर्थाने ‘ विविधतेत एकता ‘ दर्शवणारी, कला-एकात्मिक शिक्षण या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवणारी चळवळ आहे.

डिजिटल माध्यम आणि GenZ चा सहभाग

‘रंग २०२६’ मध्ये खालील सर्जनशील प्रकारांचा समावेश केला आहे. यामुळे तरुणांना आपले विचार विविध माध्यमातून ठेवण्यासाठी योग्य प्रकाराचा वापर करता येईल.

  • चित्रकला (Drawing & Painting)
  • निबंध लेखन (Essay Writing)
  • वक्तृत्व स्पर्धा (Elocution)
  • लघुपट (Short Film)
  • ब्लॉगिंग / व्लॉगिंग (Vlogging)

चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व आणि लघुपट या पारंपारिक व आधुनिक माध्यमांसोबतच, व्लॉगिंग द्वारे तरुणांना स्वतः पर्यटन स्थळांची ओळख करून देण्याची संधी मिळेल आहे. यामुळे यूट्यूब, इंस्टाग्राम यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारताच्या सांस्कृतिक पर्यटनाचा एक प्रचंड मोठा डिजिटल डेटाबेस आपोआप तयार होतोय. तरुण मुले स्वतः आपल्या संस्कृतीचे डिजिटल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनत आहेत, ही २१ व्या शतकातील सांस्कृतिक क्रांतीच म्हणावी लागेल.

‘रंग २०२६’ हे केवळ विजेत्यांना पदके किंवा प्रमाणपत्रे देण्यापुरते मर्यादित नाही. हा उपक्रम देशाच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयासाठी एका सुवर्णसंधीसारखा आहे. या स्पर्धेतून समोर येणारे उत्कृष्ट लघुपट, व्लॉग्स आणि चित्रे यांचा वापर देशाच्या भविष्य कालीन गतिविधी साठी करण्यात येऊ शकेल. 

“सर्जनशीलतेला वाव, भविष्याला प्रेरणा!” हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य केवळ कागदावर नसून ते प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे. जेव्हा एखादी तरुण मुलगी कॅनव्हासवर अजंठा-वेरूळची शिल्पे रंगवते किंवा एखादा तरुण लडाखच्या मठांवर व्लॉग बनवतो, तेव्हा तो केवळ एका स्पर्धेत भाग घेत नसतो; तर तो भारताच्या प्राचीन वारशाला भविष्यातील पिढ्यांसाठी जिवंत ठेवत असतो.

आधुनिक जगाचा  स्वीकार करताना स्वतःच्या सांस्कृतिक वारशाचा विसर पडू न देणे, हेच खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत’ घडवण्याचे मुख्य सूत्र आहे. ‘रंग २०२६’ ही चळवळ याच सूत्राला पकडून भारताच्या भव्य भविष्याची पायाभरणी करेल असा विश्वास आहे. तरुण पिढीच्या हातात असलेली ही सर्जनशीलतेची मशाल भारताच्या वारसा आणि पर्यटनाला जगात एक नवी आणि दैदिप्यमान ओळख मिळवून देईल, यात शंका नाही.

अन्य लेख

संबंधित लेख