७ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित श्रीनगरमधील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’ची सर्व ६ कडवी (छंद) गाण्यात आली आणि या “संपूर्ण वंदे मातरम्” साठी अब्दुल्ला पिता-पुत्र पूर्ण वेळ उभे राहिले…
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, वंदे मातरम् चे संपूर्ण व्हर्जन भारताच्या सर्वसमावेशक आणि बहुविध संस्कृतीच्या चौकटीत बसत नाही… काँग्रेसने त्यांच्या १९३७ च्या प्रस्तावाचा हवाला देत
म्हटले की, जातीय सलोखा राखण्यासाठी फक्त पहिली २ कडवीच गावीत असा निर्णय स्वातंत्र्यसैनिकांनी (महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद इत्यादी) घेतला होता… त्यामुळे मित्रपक्षांनीही या भूमिकेचे पालन करावे, असा अनाहूत सल्ला काँग्रेसने दिला…
ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने काँग्रेसला… ते आपल्या मित्रपक्षांवर त्यांच्या अटी किंवा नियम लादू शकत नाहीत… राष्ट्रीय गीताचा पूर्ण आदर करणे ही आमची भूमिका आहे… असे सुनावले आहे…
ज्या १९३७ सालच्या प्रस्तावाचा कांग्रेस हवाला देत आहे तो प्रस्ताव काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनातील आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब अशी की… त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते…
संपूर्ण वंदे मातरम् ला प्राणप्रणाने विरोध केला होता… मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लीम लीगने… हिंदुस्थानतल्या
मुसलमानांनी मुस्लिम लीग बरोबर जाऊ नये… काँग्रेस बरोबर रहावे यासाठी काँग्रेसने मुसलमानांचे बेसुमार लांगूलचालन चालवले होते… मुसलमान बरोबर असल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही या न्यूनगंडातून काँग्रेसची ही केविलवाणी धडपड चालली होती…
त्याचाच परिपाक म्हणून काँग्रेसने खंडित वंदे मातरम स्वीकारले… अन्यथा संपूर्ण वंदे मातरम ची काटछाट करण्यासाठी काँग्रेसकडे दुसरे कोणतेही तार्किक अथवा नैतिक कारण नव्हते… हा एकतर्फी निर्णय घेताना काँग्रेसने सकल हिंदू समाजाच्या भावनांचा कणमात्र देखील विचार केला नाही…
एक तात्पुरती रणनीती म्हणून या निर्णयाकडे पाहिले तरी…
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर… ज्यांचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध होता त्यांना आमच्याच मातृभूमीचे विभाजन करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसाठी वेगळी भूमी दिली होती… आणि ते रावीपार निघून गेले होते… त्यामुळे पुन्हासंपूर्ण वंदे मातरमचा उद्घोष करणे काँग्रेसचे कर्तव्य होते…
पण मुस्लिम लांगुलचालन नसानसात भरलेल्या काँग्रेसने संपूर्ण वंदे मातरम चा विचार देखील मनात आणला नाही… देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिम लीगचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले होते… पण काँग्रेसने ती उणीव भासू दिली नाही…
१९३७ च्या काँग्रेस अधिवेशनाचा हवाला देणारी आजची काँग्रेस… संपूर्ण वंदे मातरमचा ठराव संसदेत पारित झाला आहे हे वास्तव डोळ्याआड करते आहे… काँग्रेस शासित राज्य सरकारे २ कडव्यांचेच वंदे मातरम् म्हणणार असा ठराव करून काँग्रेसने देशाच्या संसदेला व पर्यायाने सार्वभौमत्वालाच आव्हान दिले आहे… हा देशद्रोह नव्हे काय?…
आणि आता तर काँग्रेस आपली नीच मानसिकता मित्र पक्षांवर थोपू पहात आहे… पण सुदैवाने काँग्रेसच्या काही मित्रपक्षांची तरी बुद्धी ठिकाणावर आहे असे म्हणावे लागेल…
नॅशनल कॉन्फरन्स हा त्यापैकी एक मित्रपक्ष… आज नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीर या राज्यात सत्तारूढ आहे… ओमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत… त्यांचे पिताश्री अनेक वर्षे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत… त्या दोघांना आपल्या संविधानिक जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे… आणि विशेष म्हणजे काँग्रेससारख्या नतद्रष्ट मित्रपक्षाच्या नादी लागून भारताच्या संसदेने पारित केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् चा अवमान केल्यास आपल्याला काय किंमत चुकवावी लागेल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे… त्यामुळे ते संपूर्ण वंदे मातरमसाठी उभे राहिले… त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सने बेधडक काँग्रेसला धुडकावून लावले आहे…
सध्या UPA मध्ये काँग्रेसचे… राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप), द्रविड मुन्नेत्र कळगम, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना (उबाठा) यासारखे मित्रपक्ष आहेत ते कोणीही सत्तेवर नाहीत… त्यामुळे त्यांच्यासमोर आज हे धर्मसंकट उभे राहिलेले नाही… सध्या तरी ते गप्प आहेत… पण आज ना उद्या त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल… त्यावेळी ते काँग्रेस सारख्या दळभद्री मित्र पक्षाच्या मागे फरफटत जातात की भारताच्या संसदेचा सन्मान राखतात हे दिसून येईलच…
मात्र नॅशनल कॉन्फरन्सच्या मागोमाग सत्वपरीक्षा आहे ती झारखंड मुक्ती मोर्चाची… परंतु झारखंडमधील सत्तेमध्ये काँग्रेस हा दुय्यम पक्ष असल्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसच्या दुराग्रहाला बांधलेली नाही… नॅशनल कॉन्फरन्स प्रमाणे त्यांनाही सद्बुद्धी झाली तर झारखंड विधानसभेत संपूर्ण वंदे मातरम वाजवले जाईल याविषयी शंका नको…
संपूर्ण वंदे मातरम ला नकार देऊन काँग्रेसने सकल हिंदू समाजाला मनोमन दुखावले आहे… आधीच रसातळाला गेलेल्या काँग्रेसला सकल हिंदू समाजाची ही नाराजी येत्या निवडणूकमध्ये भलतीच भारी पडणार आहे…
शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज ना उद्या काँग्रेसच्या या सडक्या मानसिकतेचा इलाज करावाच लागणार आहे… पंतप्रधानांचे सरकारी कार्यालय व आस्थापनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारील फोटो उतरवण्याची मोहीम देखील महाराष्ट्रात एका नगण्य राजकीय पक्षाकडून सुरू झाली आहे…
याचा एकत्रित इलाज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला रामायणातील एका दोह्याचा आधार घ्यावा लागणार आहे…
विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति।
बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।
सीतामातेचा शोध लागला, तेव्हा प्रभू श्रीराम आणि त्यांची वानरसेना लंकेवर आक्रमण करण्यासाठी अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली… लंका गाठण्यासाठी एवढा मोठा समुद्र कसा पार करायचा, हा मोठा प्रश्न होता…
प्रभू श्रीरामांनी समुद्राच्या किनाऱ्यावर दर्भाचे आसन मांडले आणि ते तिथे ध्यानस्थ बसले… त्यांनी लागोपाठ ३ दिवस समुद्राची प्रार्थना केली, त्याला मार्ग देण्याची विनवणी केली… परंतु, समुद्राला आपल्या अथांगतेचा आणि शक्तीचा मोठा अहंकार होता… त्याने श्रीरामांच्या नम्रतेला त्यांची ‘दुर्बलता’ (कमकुवतपणा) समजले… ३ दिवस उलटून गेले, तरी समुद्राने प्रभू श्रीरामांच्या प्रार्थनेला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि मार्गही दिला नाही… हे पाहून प्रभू श्रीरामांचा संयम सुटला आणि ते अत्यंत क्रोधित झाले… ते लक्ष्मणजींना म्हणाले, “लक्ष्मणा, माझे धनुष्य आणि अग्नीबाण आण!… श्रीरामांनी धनुष्याला अग्नीबाण लावला आणि जशी प्रत्यंचा ओढली, तसा संपूर्ण समुद्र खवळला… समुद्रातील जलचर प्राणी होरपळू लागले, मोठे लाट उसळू लागल्या आणि पृथ्वी कापायला लागली…
आपला अंत जवळ आला आहे हे पाहून समुद्रदेव अत्यंत भयभीत झाले… ते लगेच हातात सोन्याचे ताट घेऊन, ब्राह्मणाचे रूप धारण करून श्रीरामांच्या चरणी शरण आले… त्यांनी श्रीरामांची माफी मागितली आणि प्रभूंच्या शक्तीपुढे नतमस्तक झाले… त्यानंतर समुद्रदेवाने स्वतःहून वानरसेनेला पार जाण्यासाठी ‘नल’ आणि ‘नील’ यांच्या माध्यमातून पूल (रामसेतू) बांधण्याचा उपाय सांगितला… समुद्राला शरण आलेले पाहून आणि त्याची भीती पाहून प्रभू श्रीरामांनी हा प्रसिद्ध विचार मांडला की— “भय बिनु होइ न प्रीति” म्हणजेच, काही लोकांच्या मनात जोपर्यंत शक्तीची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मनात खऱ्या आदराची किंवा प्रेमाची भावना जागृत होत नाही…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या सहनशक्तीला त्यांचा कमकुवतपणा समजणाऱ्या… भारतीय संसदेचा… सार्वभौमत्वाचा… जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा अनादर करणाऱ्या कपाळकरंट्यांना वठणीवर आणण्यासाठी… आज ना उद्या वठणीवर आणण्यासाठी कायद्याची प्रत्यंच्या ओढावीच लागेल…
“भय बिनु होइ न प्रीति” हीच आपल्या इतिहासाची शिकवण आहे…