Tuesday, September 17, 2024

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

Share

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे पण गेल्या काही वर्षा पासून महाराष्ट्र मराठा आरक्षण आंदोलन तथा जातीय तीव्रतेच्या विखारी वाक्तव्या मुळे सतत धगधगत आहे गरजवंत मराठा समाजाला घटनेच्या चौकटतील आरक्षण मिळावे सर्वांची इच्छा आहे कारण महाराष्ट्राच्या जडणघडण मध्ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे परंतु सद्यस्थिती मध्ये मराठा आरक्षण मुद्दामुळे जातीय वितुष्ट निर्माण होऊन महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कळीत केली जात आहे ही वीण कोण करीत आहेत? यामागे कोणत्या शक्ती आहेत किंवा कोणाचा मेंदू कार्यरत आहे.

हा विचार करण्याची आवश्यकता आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रात जे काही समाज विघटनाचे षडयंत्रकारी वैचारीक प्रदुर्षणचे प्रयोग सुरू आहेत ते मराठा समाजाला सुध्दा मान्य नाहीत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांचां मागोवा घेतल्यास कधी पुरुषोत्तम खेडेकर यांनी निर्माण केलेल्या वैचारिक गोंधळामुळे तर कधी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनमुळे तसेच शरद पवार यांच्या पुणेरी पगडी ते छत्रपती-पेशवे,-मणिपूर अशा हिंदूत्व विरोधी व संभ्रम निर्माण करणाऱ्या वैचारीक विद्वेषी भूमिका मुळे महाराष्ट्र अशांतेच्या दिशेने जात असून सामाजिक ऐक्याची वीण जाणीवपूर्वक विस्कळीत केली जात आहे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काही वर्षा पूर्वी शिवधर्म संकल्पना मांडून मराठा विरुद्ध ब्राम्हण असा वैचारिक संघर्ष उभा केला होता तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या विरुद्ध टीकेची झोड उठविली होती आता मराठा आरक्षणा च्या मुद्दावरुन मनोज जरांगे यांनी मराठा विरुद्ध ओ.बी.सी असा जातीय संघर्ष उभा करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी खालच्या पातळीची अश्लील शिवीगाळ करणारी तथा एकेरी भाषेचा प्रयोग करून टार्गेट करीत आहेत तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य सतत करीत आहेत

महाराष्ट्रातील खेडेकर ते जरांगे यांच्या चळवळीचा विचार केल्यास असे लक्षात येते की त्यांचे षडयंत्राचे प्रयोग जरी अराजकीय दिसत असले तरी त्यांचा हेतू राजकीय असल्याचे अनेक वेळा महाराष्ट्राने पाहिले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खेडेकर “शरद पवार आजचे शिवाजी आपण मावळे होऊन दिल्ली काबीज करू” म्हणतात तर जरांगे विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा चे २८८ पाडा देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून कायम संपवा अशी राजकीय भाषा करतात त्यामुळे खेडेकर व जरांगे मराठा समाजाच्या विकाससाठी नव्हे तर कोणाच्या तरी राजकीय फायदासाठी महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची वीण विस्कळीत करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यांच्या षडयंत्र प्रयोगा मुळे सामाजिक वातावरण गढूळ होत असून त्याची झळ उभ्या महाराष्ट्राला व विशेषतः मराठवाड्याला पोहचली आहे.

वास्तविक पाहता संवैधानिक पध्दतीने किंवा लोकशाहीच्या मार्गाने निवडूण आलेल्या मनोहर जोशी ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे कारण काय आहे ? जोशी असो की फडणवीस यांना टार्गेट करण्याचे प्रयोग का केले जातात ? त्यांची जात आडवी येते का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो तसेच खेडेकर ते जरांगेयांच्या चळवळीचा विचार केल्यास असे ही लक्षात येत की प्रस्थापित मराठ्यांची सत्ता गेल्यास महाराष्ट्रात अशांत करायचा व प्रस्थापितांची गेलेली सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी समाज विघटनाचे प्रयोग करायचे सामाजिक वीण विस्कळीत करायची ही कार्यपध्दती समोर येत आहे आता प्रस्थापित मराठे कोण आहेत हे वेगळं सांगायची किंवा लिहण्याची गरज नाही.

मनोहर जोशी – पुरुषोत्तम खेडेकर. महाराष्ट्रात १९९५ मध्ये सत्ता परिवर्तन होऊन हिंदूत्ववादी भाजपा- शिवसेना युतीचे पहिले बिगर कांग्रेसी सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले सरकारची कामगिरी चांगली होती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात शाळकरी मुलींना एस.टी.बस मोफत प्रवास सुरू करणारे देशातील पाहिले सरकार होते जोशी सरकारचा क्रांतीकारी निर्णय होता सरकारचा बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रवास सुरू असताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघ संघटनेची बांधणी केली आणि हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी ब्राम्हण विरोधी भूमिका घेतली हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचा त्याग करून शिवधर्म मांडला त्यासाठी त्यांनी राज्यात मराठा जोडो यात्रा काढून मराठा तरुणांच्या डोक्यात जातीय तीव्रतेची पेरणी केली त्यांची माथी भडकावून मराठा विरुद्ध ब्राम्हण वैचारीक संघर्ष निर्माण केला त्यासाठी शेकडो निराधार असलेली पुस्तके प्रकाशित करून प्रचंड संभ्रम निर्माण केला होता भांडारकर संस्थेवर हल्ला , लेखकांच्या तोंडाला काळे फासणे करणे,बाबासाहेब पुरंदरे यांचा विरोध,रायगडा वरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी पासून गडकरी पुतळा फोडतोड तसेच आम्ही सांगू तोच इतिहास व आम्ही देऊ तेच पुरावे अशी दडशाहीची भूमिका घेऊन दहशत निर्माण केली होती मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन नारायण राणे मुख्यमंत्री झाले नंतरच्या काळात भाजपा शिवसेना युतीचे सरकार पुन्हा येऊ शकले नाही

राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे स्थापन झाले पुरुषोत्तम खेडेकर यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून भाजपा सह हिंदुत्ववादी संघटनांना विरोध आणि काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारला सहाय्यभूत ठरणाऱ्या सोईच्या भूमिका घेतल्या आहेत शेवटी मराठा समाजाची दिशाभूल करून मुस्लिम अनुनय केला त्या साठी शिवपुत्र शंभूराजे यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात खेडेकरांची भूमिका महत्त्वाची होती देवेंद्र फडणवीस- मनोज जरांगे महाराष्ट्रात २०१४ मध्ये सत्तांतर होऊन भाजपा शिवसेना युतीचे सरकार आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याच दरम्यान माणूसिकीला काळीमा फासणारी घटना दि १३जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथे घडली व कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले पहिला मोर्चा संभाजीनगर मध्ये निघाला पुढील मोर्च्यात मराठा आरक्षण मागणी सुध्दा जोर धरू लागली होती जवळपास ५६ मोर्चे निघाले होते वर्धा येथील मोर्च्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली वास्तविक बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार व मराठा मोर्चा याचा काहीही संबंध नसताना मुद्दा कसा आला व कोणी आणला? नंतर च्या काळात मराठा मोर्च्या मधुन सरळ सरळ फडणवीस विरुद्ध भूमिका घेऊन त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल पूजेस रोखण्यात आले पंढरपूर यात्रेत आल्यास सर्प सोडण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या “आरक्षण मागतो बायको नाही” घोषणे मुळे मोर्चाची दिशा फडणवीस यांचा विरोधात तीव्र करण्यात आली पुढे मराठाआरक्षण मागणीचे केंद्रआंतरवली सराटी होऊन मनोज जरांगे आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे

मराठा आरक्षण ओ.बी. सी मधुन मिळावे या मुद्दामुळे ओ.बीसी. नेत्यांना गावबंदी, घरावर हल्ले व जाळपोळ इत्यादी सरकारी यंत्रणांना वेठीस धरणे अशा प्रयोगामुळे महाराष्ट्र सतत धगधगत आहे आणि अशा प्रयोगा मधुन महाराष्ट्राची सामाजिक वीण जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे शेवटी जरांगे यांच्या कार्यपध्दतीचा विचार केल्यास असे लक्षात येते की, खेडेकर प्रमाणे जरांगे यांनी सुध्दा जातीय विद्वेष निर्माण करून मुस्लिम अनुनय करण्यासा सुरूवात केली त्यासाठी दर्गे व मशिद मध्ये जाऊन मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे महाराष्ट्रात ३० जुन २०२२ ला मविआ सरकार कोसळून महाआघाडीचे शिंदे सरकार आले मुख्यमंत्री शिंदे असले तरी सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरत आहे त्यामुळे जरांगे मराठा समाजाला ओ.बी.सी मधुनच आरक्षण मिळावे म्हणून फडणवीस यांना टार्गेट करत आहेत वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजा साठी अनेक योजना आखल्या आहेत सारथी व अण्णासाहेब विकास महामंडळा द्वारे लाभ सुद्धा मराठा तरुणांना मिळत आहे परंतू नाजिकच्या काळातील घटना व वक्तव्यचा मागोवा घेतल्यास ही लढाई आरक्षणाची आहे की राजकारणाची ? अशी शंका येऊ लागली आहे कारण मनोज जरांगे यांनी सरळ सरळ भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करून भाजपाच्या सर्व जागा पाडण्याचे व फडणवीस यांना सत्ते मधुन बाद करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे या पूर्वी महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा विरुद्ध ब्राम्हण असा संघर्ष उभा करून महाराष्ट्रात हिंदु मध्ये उभी फूट व सामाजिक ऐक्याची वीण विस्कळीत करण्याची खेळी खेळली होती

आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे तसेच मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा विचार केल्यास ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर काहीच बोलत नाहीत त्यांचा रोष केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच दिसत आहे “एक वेळा मविआ व शिंदेचे आमदार निवडून देऊ पण भाजपाचे पाडू” ही भूमिका लक्षवेधी असून शुध्द राजकीय हेतुने प्रेरीत आहे त्यामुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले खेडेकर व फडणवीस मुख्यमंत्री झाले की जरांगे उभे करून राजकीय हेतूने महाराष्ट्रात जातीय वणवा पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे व सामाजिक वीण विस्कळीत करण्याचे षडयंत्र केले जाते अशी चर्चा सामान्य माणसा मध्ये होत व त्याची उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे.

अशोक राणे,अकोला

अन्य लेख

संबंधित लेख