Wednesday, May 20, 2026

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव

Share

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले आहे. आपल्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलांसह दर्शनासाठी निघालेले भाविक रोहीदास लोखंडे यांच्या रिक्षाला दोन मुस्लिम तरुणांनी पाठीमागून धडक दिली. या किरकोळ अपघाताचे निमित्त करून शेकडोच्या संख्येने गोळा झालेल्या धर्मांध जमावाने लोखंडे यांना रिक्षातून बाहेर ओढून बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, यावेळी मध्यस्थी करणाऱ्या महिलांना, एका अल्पवयीन मुलीला आणि अगदी लहान बाळालाही जमावाने सोडले नाही. महिलांना रस्त्यावर ओढून जनावरासारखी मारहाण करण्यात आली आणि याच गोंधळाचा फायदा घेत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही लुटण्यात आले.

या घटनेमागे केवळ तात्कालिक राग नसून तो एक वाढता ‘जिहादी उन्माद’ असल्याचा आरोप स्थानिक हिंदू समाजातून होत आहे. विशेषतः या गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारे राजकीय पाठबळ चिंतेचा विषय बनले आहे. २०२४ च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता, नेकनूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक मुस्लिम बहुल बूथवर झालेली एकतर्फी मतपेढी (व्होट जिहाद) गुन्हेगारांसाठी ढाल बनत असल्याचे दिसून येते. याच राजकीय ताकदीच्या जोरावर अनधिकृत अतिक्रमणे, कत्तलखाने आणि लव्ह जिहाद सारख्या घटनांना बळ मिळत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या व्होट बँकेला धक्का लागू नये म्हणून अशा गुन्हेगारांच्या कृत्यांवर पांघरूण घालत असल्याची टीकाही आता उघडपणे केली जात आहे.

या अन्यायाविरुद्ध हिंदू समाजाने संघटित होत नेकनूरमध्ये भव्य ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. या मोर्चाला बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, आमदार महेश लांडगे आणि आमदार संग्राम जगताप यांनी संबोधित केले. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या समुदायाने आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात निर्माण झालेली असुरक्षितता दूर करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे असून, हिंदू समाजाने अशा दबावाच्या राजकारणाविरुद्ध जागरूक राहणे काळाची गरज बनली आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख