Tuesday, January 28, 2025

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

Share

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवार आपापल्या मतदारसंघात अर्ज दाखल करत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.

दादाजी भुसे यांचा मालेगाव बाह्य मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल, सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्या गुरनुले यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणूकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅंटॉन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी सोमवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. एकच आनंद .. मनिष आनंद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले.

अन्य लेख

संबंधित लेख