Tuesday, September 17, 2024

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

Share

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 8 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. भट्टाचार्जी यांचे कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी शोक व्यक्त केला

भट्टाचार्जी हे कम्युनिस्ट विचारसरणीशी आसलेल्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनावर विविध पक्षांतील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे, माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य त्यांच्या साधेपणा, सचोटी आणि साहित्य आणि कलेची आवड यासाठी प्रसिद्ध होते.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यावर 9 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम संस्कार होणार आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयात दान केले जाईल. पश्चिम बंगाल सरकारने माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल 8 ऑगस्ट 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख