Tuesday, December 3, 2024

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार

Share

गंगाखेड : बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली गंगाखेड (Gangakhed) शहरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात “विराट हिंदू मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे. या सभेला गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर आणि महंत योगी दत्तनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मोर्चा गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मोठा बालाजी मंदिर गोदातट येथून सुरू होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सभेने समाप्ती होईल.

बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणे आणि हिंदू एकतेचे प्रदर्शन करणे हे “विराट हिंदू मोर्चा”चे प्रमुख उद्दिष्ट आहे. शहरातील हजारो हिंदू बंधू भगिनींनी या मोर्चात सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन सकल हिंदू समाज गंगाखेड शहराच्या आयोजकांनी केले आहे. गंगाखेडमध्ये हजारोंच्या संख्येने एकता दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येणार आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या दुर्दशेकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यासाठी विविध हिंदू संघटना आणि संबंधित नागरिकांचा सहभाग असलेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख