Tuesday, March 10, 2026

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम

Share

मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले आहे.

‘हिंद-दी-चादर’ म्हणजे हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल. श्री गुरु तेग बहादूर साहेबांनी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम आखला आहे. ६० कलावंतांच्या संचाद्वारे सादर होणारा हा सोहळा पंजाबी भक्ती गीते, जोशपूर्ण भांगडा नृत्य आणि प्रेरणादायी नाट्याविष्कारांनी नटलेला असेल.

राज्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक (१२ ते २३ मार्च)
हा सांस्कृतिक महोत्सव राज्यातील खालील ८ शहरांत पार पडणार आहे.

तारीखशहर / ठिकाणवेळ
१२ मार्चनवी मुंबई (वाशी): साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर ६
१३ मार्चठाणे (मीरा रोड): गानसम्राज्ञी लता मंगेशकर हॉल
१४ मार्चनांदेड: शंकरराव चव्हाण सभागृहसायं. ५:०० वा.
१५ मार्चछत्रपती संभाजीनगर: यशवंतराव चव्हाण रंगमंदिरसायं. ४:३० वा.
१६ मार्चअकोला: प्रमिलाताई ओक नाट्यगृहसायं. ६:३० वा.
१७ मार्चनागपूर: सायंटिफिक हॉलसकाळी ११:०० वा.
१८ मार्चनाशिक: कालिदास रंगमंदिरसायं. ५:०० वा.
२३ मार्चपुणे: आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी चिंचवडसायं. ५:०० वा.

हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः तरुण पिढीने या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील विविध धर्म आणि संप्रदायांना एकत्र आणणारा ठरेल.

अन्य लेख

संबंधित लेख