Monday, June 24, 2024

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे…

Share

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) हे सातत्याने बेताल वक्तव्ये करत असतात, त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) बिनशर्त पाठींबा दिला तेव्हापासून संजय राऊत राज ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. आता मनसेच्या (MNS) वतीने तसच प्रत्युत्तर दिलं आहे.. इतकेच नाही तर त्यांचा येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयामध्ये ॲडमिट फॉर्म देखील भरण्यात आला आहे.

या संदर्भात गजानन काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. “संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवार साहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार वाटतात. उद्धव पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नये? असं ते बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोगरुग्णालयाचा संजय राऊत यांचा एडमिशन फॉर्म भरला आहे” असं  गजानन काळे  यांनी म्हटलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना गेट वेल सून म्हटलं आहे. “अ‍ॅडमिट होऊन योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच परत यावे…काळजी घ्या … !!!” असं ते यावेळी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख