न्यू यॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी (ऑक्टोबर २०२६) न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथील ‘ओम शक्ती मंदिराला’ भेट देऊन आपल्या सूटवर पारंपारिक दुपट्टा परिधान करून भारतीय नागरिकांसोबत गरबा नृत्याचा आनंद घेतला… तसेच देवीची आरती आणि पूजा-अर्चाही केली… त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे…
त्यांनी सोशल मीडियावरून हिंदू समुदायाला नवरात्र आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या… आपल्या संदेशात त्यांनी गरबा, सिंदूर खेळ, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे आणि घरात ‘गोलू’ मांडणी करणे यांसारख्या विविध परंपरांचा आदरपूर्वक उल्लेख केला… “तुमचे कुटुंब या सणाला दुर्गा पूजा, दसरा किंवा नवरात्र काहीही म्हणत असो, हा काळ सर्वांसाठी आत्मचिंतन आणि नूतनीकरणाचा ठरो,” असे ते म्हणाले.
या आनंदाच्या प्रसंगी त्यांनी सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेशही दिला… अमेरिकेतील इलिनॉय (Illinois) येथील एका हिंदू मंदिरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रयत्नाचा संदर्भ देत, त्यांनी अशा द्वेषाविरोधात समाजाने एकत्र उभे राहण्याचे आणि एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन केले…
जोहरान ममदानी हे न्यू यॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर आहेत…
आणि ते हेच महापौर आहेत ज्यांनी पत्रकार परिषदेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या (ऑगस्ट २०२६ मध्ये) मेडिसन स्क्वेअर येथे अमेरिकेतील हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते… त्यांनी संघाच्याच्या विचारसरणीला “वगळणारी किंवा संकुचित विचारसरणी” (Exclusionary Vision) असे संबोधले होते…
जोहरान ममदानी यांनी असेही सांगितले होते की, त्यांची आई आणि कुटुंब भारतात राहतात. त्यांनी बालपणापासून भारताची ओळख एक धर्मनिरपेक्ष, बहुलवादी आणि सर्वसमावेशक समाज अशी पाहिली आहे, ज्याला संघाची विचारसरणी तडा देते…
जोहरान ममदानी यांनी विरोध केला असला तरी, हा एक ‘खाजगी कार्यक्रम’ असल्याने तो रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे सरसंघचालकांचा नियोजीत कार्यक्रम ते रद्द करू शकले नाहीत…
आता खरे जोहरान ममदानी कोणते असा आपल्याला प्रश्न पडला असेल… तर एकतर हिंदूद्वेषाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून… दिग्दर्शिका मीरा नायर यांच्याकडून मिळाले असावे…
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखक सलमान रश्दी आणि चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांनी न्यू यॉर्कमधील एका डिनर कार्यक्रमात भारतातील ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि लोकशाहीसाठी सुरू असलेल्या युवा आंदोलनाचे समर्थन केले आहे…
सलमान रश्दी यांनी भारतातील तरुणांच्या आंदोलनाला देशातील “सर्वात आशादायक क्षण” म्हटले आणि त्यामुळे “झुरळांचा उत्सव साजरा करा” अशी टिप्पणी केली…
दिग्दर्शिका मीरा नायर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना स्वतःचे वर्णन “झुरळाची आई” (Cockroach Mom) असे केले आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या तरुणांबद्दल अभिमान व्यक्त केला…
ही चर्चा न्यू यॉर्क मधील ‘एशियन अमेरिकन रायटर्स वर्कशॉप’ साठी आयोजित केलेल्या एका निधी उभारणीच्या आणि दिवाळी डिनर दरम्यान झाली…
जी आई स्वतःला… ‘रिजिम चेंज’ करण्यासाठी रस्त्यावर उतरून अराजक माजवणाऱ्या “झुरळांची आई” म्हणवून घेते तिने… धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्या आड बाळ जोहरानवर फक्त हिंदुद्वेषाचेच संस्कार केले असणार याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही…
दुसरे म्हणजे… इस्लाममधील अल-तकिया… ” काफिरांना फसवण्याची किंवा खोटे बोलण्याची युक्ती”…
जोहरान ममदानी यांनी एकाच वेळी गरबा खेळणे दुर्गा पुजा करणे व त्याच वेळी जगातील सकल हिंदू समाजाच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या प्रमुखांच्या… सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला जाहीर विरोध करणे हा अल-तकीया नाही तर दुसरे काय?… पण आता सकल हिंदू समाज जागृत झाला आहे… सुबुद्ध झाला आहे… तो जोहरान ममदानी यांचा हा अल-तकिया बरोबर ओळखून आहे…