पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला.
चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, “आपण हिंदूंनी आपला प्रत्येक व्यवहार हिंदूंसोबतच करावा. भाजी खरेदी असो किंवा केशकर्तन, या सर्व सेवा केवळ आपल्याच धर्माच्या व्यक्तींकडून घ्याव्यात.” जिहादी मानसिकतेशी आमचा कोणताही संबंध नाही, आम्ही केवळ हिंदू धर्माला मानणार आणि त्याचेच रक्षण करणार, असा सामूहिक निश्चय यावेळी करण्यात आला.
या आवाहनाला चित्रपटगृहात उपस्थित असलेल्या अबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत हिंदूंनी सतर्क राहणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेतून उमटली.
‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागानेही समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण केल्याचे चित्र पालघरमध्ये पाहायला मिळाले. लव जिहाद आणि धर्मांतराच्या कारस्थानांपासून सावध राहण्यासाठी अशा प्रकारच्या चित्रपटांची आणि त्यानंतर होणाऱ्या सामाजिक संवादाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.