Saturday, May 16, 2026

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था

Share

गेल्या काही महिन्यांतील सर्व प्रकल्पांचा विचार केल्यास, महाराष्ट्रात एकूण २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यातून सुमारे ३५,००० प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सप्टेंबर २०२४ मध्ये या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली. हे प्रकल्प महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी ही नक्कीच एक सकारात्मक बातमी आहे.

मोठ्या उद्योगांमुळे स्थानिक लघु आणि मध्यम उद्योगांना पुरवठा साखळीच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील. पनवेलमधील प्रकल्पामुळे भारत चिप (सेमीकंडक्टर) उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. हा प्रकल्प अदानी समूहाच्या सहकार्याने साकारला जात आहे.  टोयोटा आणि स्कोडाच्या प्रकल्पामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर राहतील. ही गुंतवणूक केवळ मुंबई-पुणे पट्ट्यात मर्यादित न राहता विदर्भ (अमरावती) आणि मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर) या भागांतही मोठ्या प्रमाणावर पोहोचली आहे.

गुंतवणुक आणि प्रमुख प्रकल्प

एकूण १.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रामुख्याने सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) या क्षेत्रांत होणार आहे.

प्रकल्प / कंपनीगुंतवणूक (रुपये)ठिकाणरोजगार
टॉवर सेमीकंडक्टर (Tower Semiconductor)₹८३,९४७ कोटीपनवेल (रायगड)१५,०००
टोयोटा किर्लोस्कर (Toyota Kirloskar)₹२१,२७३ कोटीछत्रपती संभाजीनगर१२,०००
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन (Skoda VW)₹१२,००० कोटीपुणे (चाकण)१,०००
रेमंड लक्झरी कॉटन्स (Raymond)₹१८८ कोटीअमरावती५५०

केस स्टडी म्हणून टावर सेमीकंडक्टर हा उद्योग घेऊ.  टॉवर सेमीकंडक्टर या उद्योगामध्ये लागणारे  उच्चस्तरीय तज्ज्ञ व कामगार वर्ग यांच समीकरण बघू शकतो. टॉवर सेमीकंडक्टर सारख्या हाय-टेक सेमीकंडक्टर उद्योगात (ज्याला ‘Fab’ किंवा Foundry म्हणतात) काम करण्यासाठी अत्यंत उच्च दर्जाच्या तांत्रिक कौशल्यांची गरज असते. हा प्रकल्प केवळ साधी मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसून, ते जगातील सर्वात गुंतागुंतीच्या विज्ञान आणि अभियांत्रिकीचे केंद्र असेल.

या उद्योगासाठी आवश्यक असलेली कौशल्यांची  प्रामुख्याने तीन मुख्य भागांत विभागणी होते.

१. अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्ये

२. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स कौशल्यॉ

३. प्रगत सॉफ्टवेअर आणि डेटा कौशल्ये

१. अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्ये – सेमीकंडक्टर फॅबमध्ये काम करण्यासाठी महत्त्वाचे विषय तज्ज्ञांद्वारे हाताळण्याची  गरज असते. सिलिकॉन वेफर्सवर अत्यंत सूक्ष्म सर्किट्स कोरण्यासाठी केमिकल, मटेरियल सायन्स आणि फिजिक्स इंजिनिअर्सची गरज असते. चिपचे डिझाइन करण्यासाठी SystemVerilog, UVM आणि EDA (Electronic Design Automation) टूल्स (उदा. Cadence, Synopsys) मध्ये प्रभुत्व असावे लागते. इलेक्ट्रॉनिक्स ॲनालॉग आणि डिजिटल सर्किट डिझाइनचे सखोल ज्ञान असावे लागते.

२. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स कौशल्ये – या वातावरणात चिप बनवण्याची प्रक्रिया ही ‘क्लीनरूम’मध्ये चालते, जिथे धुळीचा एक कणही चालत नाही. अत्यंत नियंत्रित वातावरणात काम करण्याचे तंत्र (क्लीनरूम प्रोटोकॉल) पाळावा लागतो.  कोट्यवधी रुपयांच्या अत्यंत संवेदनशील मशिन्स (उदा. ASML Lithography machines) चालवण्याचे आणि दुरुस्त करण्याचे कौशल्य (प्रिसिजन इक्विपमेंट हँडलिंग) म्हणजे या मशिन्स सांभाळण्याची हातोटी असावयास हवी. उत्पादनामध्ये १००० पैकी ९९९ चिप्स व्यवस्थित निघाल्या पाहिजेत (High Yield), यासाठी ‘स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल’चे ज्ञान आवश्यक असते.

३. प्रगत सॉफ्टवेअर आणि डेटा कौशल्ये – तिसऱ्या बाजूला आधुनिक फॅब्स हे पूर्णपणे स्वयंचलित (Automated) असतात. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला जोडण्यासाठी एम्बेडेड सिस्टम्स आणि फर्मवेअर म्हणजेच C, C++ आणि Python भाषेचे ज्ञान अवगत असण्याची गॅरंटज असते.  मशिन्स कधी खराब होऊ शकतात याचा अंदाज बांधण्यासाठी (AI आणि डेटा ॲनालिटिक्स – Predictive Maintenance) एआयचा वापर होत असतो. फॅक्टरीमधील स्वयंचलित रोबोट्स नियंत्रित करण्यासाठी PLC आणि रोबोटिक्स मध्ये गुंतवणूक केली जाते .

टावर सेमीकंडक्टरसारखा प्रकल्प जेव्हा उभा राहतो, तेव्हा त्यातील १५,००० नोकऱ्यांचे स्वरूप हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारे असते. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार आणि जागतिक ‘फॅब’ (Semiconductor Fab) मानकांनुसार, या मनुष्यबळाची मोठी गरज तयार होणार आहे. सध्या महाराष्ट्रात (आणि भारतात) चिप ‘डिझाइन’ करणारी मुले भरपूर आहेत (उदा. पुणे, बेंगळुरूमध्ये), पण चिप ‘मॅन्युफॅक्चरिंग’ प्रत्यक्ष फॅबमध्ये काम करण्याचा अनुभव असणारे लोक खूपच कमी   आहेत.  भारतात सध्या व्यावसायिक ‘कमर्शियल फॅब’ नसल्यामुळे, असे कौशल्य असलेले लोक प्रामुख्याने तैवान, अमेरिका किंवा इस्रायलमधून परतलेले भारतीय असतील.  १५,००० पैकी किमान १०% ते १५% (सुमारे १,५०० – २,०००) लोक हे १०+ वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी तज्ज्ञ लागतील. बाकीचे लोक हे फ्रेशर्स किंवा इतर पूरक उद्योगांतील (उदा. फार्मा किंवा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग) अनुभवी लोक असतील ज्यांना कंपनी ट्रेनिंग देईल.

जिल्हावार भरती विभागणी  (District-wise Expectation)

विभाग / जिल्हेअपेक्षित वाटाकारण
पुणे, मुंबई, ठाणे५०% – ६०%IIT बॉम्बे, COEP, VJTI सारख्या संस्था आणि आधीच असलेले इलेक्ट्रॉनिक हब.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक१५% – २०%ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील प्रिसिजन इंजिनिअरिंगचा अनुभव असलेले मनुष्यबळ.
नागपूर, अमरावती (विदर्भ)१०% – १५%वाढती शैक्षणिक केंद्रे आणि नवीन स्टार्टअप इकोसिस्टम.
उर्वरित महाराष्ट्र१०%प्रामुख्याने तंत्रज्ञ (Technicians) आणि ऑपरेशन्स सपोर्ट.

पात्रता आणि अनुभवाचा तपशील (Projected Requirements)

या १५,००० नोकऱ्यांचे साधारण वर्गीकरण साधारणपणे तीन प्रकाराने करता येऊ शकेल – उच्च स्तरीय तज्ज्ञ, मध्यम स्तरीय इंजिनिअर्स, तंत्रज्ञ आणि सपोर्ट स्टाफ.

अ. उच्च स्तरीय तज्ज्ञ (High-Level Experts) ची १५% गरज आहे. या स्तरावर नोकऱ्यां मधली पात्रता  ही Ph.D. किंवा M.Tech (VLSI, Physics, Nano-tech) असेल. त्याचप्रमाणे जवळपास ५ ते १५ वर्षे जागतिक फॅबमध्ये काम केल्याचा अनुभव हवा असेल. एकूण असणारा कामाचा भाग पाहता  हा प्रोसेस डेव्हलपमेंट, फॅब उभारणी, आर अँड डी (R&D) अशा स्वरूपाचा असेल.

ब. मध्यम स्तरीय इंजिनिअर्स (Core Engineering) – ४५% गरज आहे. या स्तरावर नोकऱ्यां मधली पात्रता  ही   B.E. / B.Tech (Electronics, Chemical, Mechanical) असणारे उमेदवार असतील. सामान्यतः:  २ ते ७ वर्षे Precision Industry किंवा Automation चा अनुभव हवा असेल व कामाचा आवाका हा  मशीन ऑपरेशन्स, चिप टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल असा असेल.

क. तंत्रज्ञ आणि सपोर्ट स्टाफ (Technicians & Support) – ४०% गरज आहे. तिसऱ्या स्तरावरील लागणारा उमेदवार हा  ITI, डिप्लोमा, Electronics, Mechatronics झालेले असावेत. हे  फ्रेशर्स ते  ५ वर्षे अनुभव असाले तरी चालू शकतील. फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणावर संधी आहे. त्यांचं काम मॅन्युफॅक्चरिंग लाईन मेंटेनन्स, क्लीनरूम असिस्टन्स या प्रकारचं काम राहिल.

सरकारने या प्रकल्पासाठी ‘महाराष्ट्र सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याने, येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आता ‘सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग’ विषयाचे विशेष कोर्सेस सुरू होणे अपेक्षित आहे. जे तरुण आतापासून VLSI डिझाइन, नॅनो-टेक्नॉलॉजी किंवा प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वतःला प्रशिक्षित करतील, त्यांना या ८४,००० कोटींच्या गुंतवणुकीचा थेट फायदा होईल.

Asset Monetization आणि ३०,००० उच्च कुशल रोजगार

या गुंतवणुकीतून निर्माण होणारे ३०,००० रोजगार हे केवळ साधे पगारदार कर्मचारी नसतील. हे Value Adders (मूल्यवर्धन करणारे) असतील.

आर्थिक मूल्यमापनाचा तक्ता:

घटकविवरण
एकूण रोजगार३०,००० (उच्च कुशल)
सरासरी मूल्यवर्धन$५०,००० ते $८०,००० प्रति कर्मचारी
एकूण वार्षिक मूल्यवर्धन~$१.५ अब्ज ते $२.४ अब्ज (अंदाजे ₹१२,००० – २०,००० कोटी)
क्षेत्रफिनटेक, एआय (AI), रिन्यूएबल एनर्जी, लॉजिस्टिक्स

मूल्यवर्धन म्हणजे काय? – जेव्हा आपण म्हणतो की एक कर्मचारी $५०,००० चे मूल्य वाढवतो, तेव्हा याचा अर्थ असा की तो कर्मचारी कंपनीच्या उत्पादनात, नाविन्यपूर्ण संशोधनात किंवा कार्यक्षमतेत इतकी भर घालतो की ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढतो. हे मनुष्यबळ केवळ काम करत नाही, तर ते Intellectual Property (IP) निर्माण करते.

महाराष्ट्राने स्वीकारलेले ‘Asset Monetization’ धोरण आणि त्याला मिळालेली जागतिक भांडवलाची साथ यामुळे राज्याची अर्थव्यवस्था $१ ट्रिलियन कडे वेगाने जात आहे.H-1B निर्बंधांमुळे भारताला फायदा होतोय. जागतिक टॅलेंट आता महाराष्ट्रात स्थिरावत आहे. ब्रूकफील्ड आणि इतर ४० देशांच्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत आहे.  ३०,००० उच्च कुशल मनुष्यबळ हे राज्याच्या GDP मध्ये अनेक पट्टींनी  वाढ (Multiplier Effect) करेल. भारत आता केवळ एक ‘बाजारपेठ’ नाही, तर तो ‘निर्णय घेणारा देश ‘ (Decision Maker) बनला आहे.मार्क कार्नी यांच्यासारख्या व्यक्तींचा भारतावर असलेला विश्वास हे दर्शवतो की जागतिक वित्तीय धोरणांमध्ये म्हणजेच G20 आणि जागतिक बँकिंग मध्ये  भारताचा शब्द महत्त्वाचा ठरत आहे. रशिया-युक्रेन युद्ध किंवा जागतिक मंदीच्या काळातही भारताचा विकास दर (GDP Growth) स्थिर राहिल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेने भारताला ‘Bright Spot’ म्हटले आहे. महाराष्ट्र हे आता केवळ भारताचे आर्थिक केंद्र राहिले नसून, ते जागतिक पुरवठा साखळीतील (Global Supply Chain) एक अपरिहार्य दुवा बनले आहे. ही गुंतवणूक केवळ पैशांची नसून ती तंत्रज्ञान, कौशल्य आणि भविष्यातील संधींची आहे.

अपरांत कांबळे

अन्य लेख

संबंधित लेख