यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ रविवार, २४ मे २०२६ च्या मध्यरात्रीच्या सुमारास काही बजरंग दल कार्यकर्ते बिजोरा टोल नाक्यावर उभे होते. यावेळी एक संशयित पिकअप वाहन भरधाव निघाले. त्यात ८ ते १० गोवंश असल्याची शंका आल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीद्वारे पिकअप वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान पिकअपने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून पाडले. त्यात दोघे बजरंगी जखमी झाले आहेत.
याचवेळी गजानन सुरोशे हे आपल्या कारने जात होते. दुचाकीला धडक मारून जाणाऱ्या पिकअपचा त्यांनी पाठलाग केला. हे पिकअप वाहन हायवेवरून सुकळी गावाकडे वळाले, त्यांच्या मागे गजानन सुरोशे कार घेऊन गेले असता, गो-तस्करांनी कारवर तुफान दगडफेक केली. लाकडी दांडके व काठ्यांनी हल्ला चढवला (Mob Lynching). ज्यात गजानन सुरोशे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर, वाहनातील जनावरे सोडून गोतस्करांनी पळ काढला.
दरम्यान, या घटनेमुळे महागाव-उमरखेड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात गर्दी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नुकताच वारंवार गोतस्करी करणाऱ्या माफियांवर मकोका (MCOCA – Maharashtra Control of Organized Crime Act) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना यवतमाळमध्ये गोतस्करांकडून एका गोरक्षकाची मॉब लिंचिंग करून हत्या केली जाण्याची घटना केवळ संतापजनकच नाही तर अनेक चिंताजनक प्रश्न उपस्थित करणारी देखील आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने प्रचलित असलेले कायदे व नियम यांचा भंग करून वारंवार संघटित पद्धतीने गोतस्करी करणाऱ्या व्यक्ती, टोळ्या अथवा संघटनांविरुद्ध संबंधित पोलीस यंत्रणेने प्रचलित नियमानुसार तपास करून महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करावी. मकोका कारवाईत आरोपींना जामीन मिळणे अतिशय कठीण असते…
तसेच आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद असते…
राज्यातील परिवहन विभागाने अवैधरीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करुन संबंधित वाहनांवर मोटार वाहन अधिनियम व इतर आनुषंगिक कायदयांनुसार कारवाई करावी… राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालये, पोलीस आयुक्तालये त्याचप्रमाणे पशुसंवर्धन आयुक्तालय व परिवहन आयुक्तालय यांनी आपल्या स्तरावरून स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावेत… नियुक्त अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सर्व संबंधित विभागांना आणि नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत… असा गुरुवार, २१ मे २०२६ रोजी स्पष्ट शासकीय आदेश काढलेला आहे…
तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, परिवहन कार्यालये, नागरी-ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन कार्यालये या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली सीमा भागावर इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेशाच्या ठिकाणी संयुक्त तपासणी चौकी स्थापन करावी… राज्यातील सर्व संबंधित विभागांनी संयुक्त भरारी पथके स्थापन करून अवैध गोवंश वाहतूक व बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात यावी… गोवंशाचे जतन व संवर्धन प्रभावीपणे करण्यासाठी डायल ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर गो तस्करी, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तलखाने या अनुषंगाने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलीस यंत्रणेने उक्त तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करावी, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत…
गोहत्याबंदी बाबत पुढाकार घेणाऱ्या महायुती सरकारच्या कारकीर्दीत तरीही गोरक्षकांची मॉब लिंचिंग करून हत्या केली जात असेल तरती केवळ संतापजनकच नव्हे तर चिंताजनक प्रश्न उपस्थित करणारी घटना म्हणावी लागेल…
संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश तस्करीचे दिवसाला साधारण १० गुन्हे नोंदवले जातात… बकरी ईद सणाच्या वेळी मात्र यात लक्षणीय वाढ होते…
गोतस्करीसाठी महाराष्ट्रातून प्रामुख्याने हैदराबाद आणि केरळच्या दिशेने जाणारा “दख्खन कॉरिडॉर” वापरला जातो…
महाराष्ट्रात २०२४-२५ गोवंश तस्करीचे ४२० गुन्हे यवतमाळ जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत… या एकूण प्रकरणांत ५,८०० पेक्षा जास्त गोवंश जप्त करण्यात आला आहे…
तसेच गोतस्करी दरम्यान गोरक्षक आणि पोलिसांवर १२ हल्ल्यांची नोंद झाली आहे… ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे… आणि त्याच यवतमाळ जिल्ह्यात गजानन सुरोशे या गोरक्षकाची गोतस्करांनी मॉब लिंचिंग करून हत्या केली आहे… हे लक्षात घेण्यासारखे आहे…
यवतमाळ जिल्हा हा मध्य प्रदेशातून येणाऱ्या आणि तेलंगणा (हैदराबाद) कडे जाणाऱ्या गोवंशाचा मुख्य “ट्रांझिट पॉईंट” आहे… आर्णी, महागाव उमरखेड हे तालुके डोंगराळ आणि सीमेवर असल्याने गोतस्करांसाठी सोयीचे ठरतात…
शिवाय आधुनिक गोवंश तस्कर आता जुन्या पद्धती सोडून… अत्यंत हायटेक आणि लष्करी धाटणीच्या क्लुप्त्या वापरत आहेत…
तस्करांच्या गाड्यांना समोरील बाजूला जाड लोखंडी अँगल्स व आरसीसी गार्ड्स बसवले असतात… पोलीस किंवा गोरक्षकांनी नाकाबंदी केल्यास थेट त्यांच्या गाड्यांना धडक देऊन उडवण्यासाठी याचा वापर होतो…
मोठ्या कंटेनर्समध्ये दोन मजली कप्पे केले जातात… वरील कप्प्यात भाजीपाला किंवा औद्योगिक माल भरला जातो आणि खालील कप्प्यात अत्यंत अमानुषपणे गोवंश कोंबला जातो…
काही वाहनांमध्ये खिळे किंवा ऑइल सोडण्याची स्वयंचलित यंत्रणा असते… जेणेकरून पाठीमागे लागलेल्या वाहनांचे टायर पंचर व्हावेत किंवा ती घसरावीत…
तसेच तस्करांच्या मुख्य वाहनाच्या पुढे २ ते ५ किलोमीटर अंतरावर २ ते ३ दुचाकी किंवा आलिशानकार धावत असतात… त्यांचे काम रस्त्यात पोलीस नाकाबंदी… गोरक्षकांचा पहारा किंवा आरटीओ तपासणी आहे की नाही याची माहिती मुख्य गाड्यांना व्हाट्सअप कॉलिंग किंवा वॉकी टॉकीज द्वारे देणे हे असते…
तसेच गावागावातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना पैशांचे आमिष दाखवून पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले जाते…
गोतस्करांच्या या सगळ्या षडयंत्राला पुरून उरून… बजरंग दलाचे कार्यकर्ते आपले प्राण पणाला लावून… गोवंश रक्षणाचे काम करत असतात… त्यांना योग्य ते पोलीस आणि कायद्याचे संरक्षण मिळालेच पाहिजे…
जेव्हा एकाच गुन्हेगारी टोळी विरुद्ध गेल्या १० वर्षात एकापेक्षा जास्त दोषारोपपत्रे दाखल असतात तेव्हा मकोका लावला जातो… यात आरोपींना जामीन मिळणे कठीण तर असतेच शिवाय आरोपींची मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते…
मात्र तस्करांच्या भीतीमुळे किंवा स्थानिक दबावामुळे अनेकदा खाजगी साक्षीदार न्यायालयात आपली साक्ष बदलतात…
तसेच जप्त केलेले मावशी गाय किंवा गोवंशाचेच आहे हे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचा (FSL) अहवाल वेळेत मिळत नाही…
पोलिसांकडून पंचनामा करताना किंवा वाहनांची जपती करताना कायदेशीर प्रक्रियेचे तंतोतंत पालन न झाल्याने आरोपींना कायद्याच्या चौकटीतून सुटण्यास वाव मिळतो…
दुर्दैवाने भारतात दाखल होणाऱ्या एकूण गोवंश तस्करीच्या प्रकरणांपैकी केवळ १५ ते १८% प्रकरणांमध्ये आरोपींना अंतिम शिक्षा होते…
गोरक्षकांवर किंवा पोलिसांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांच्या खटल्यांमध्ये (कलम ३०२/३०७) शिक्षेचे प्रमाण थोडे जास्त म्हणजे जवळपास ३५% आहे…
गोरक्षक गजानन सुरोशे यांचे बलिदान ही आपल्या एकूणच यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहे… गोवंश तस्करी हा आता केवळ धार्मिक भावनांचा विषय राहिलेला नसून… तो राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा एक “गंभीर संघटित देशद्रोही कारवायां”चा गुन्हा बनला आहे…
गोरक्षक गजानन सुरोशेयांचे बलिदान कोणत्याही परिस्थितीत व्यर्थ जाता कामा नये…
त्यासाठी सर्वप्रथम आरोपींवर मकोका लावण्यात यावा तसेच
गोरक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचे खटले चालवण्यासाठी विशेष जलगती न्यायालयात स्थापन करावी… जेणेकरून ६ महिन्यांच्या आत गुन्हेगारांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल…
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी एकत्रितपणे अँटी कॅटल स्मगलिंग हायवे विंग तयार करावी…
सर्व राज्य सीमा आणि टोल नाक्यांवर हाय डेफिनेशन (HD) आणि नंबर प्लेट ओळखणारे (ANPR) कॅमेरे बसवणे अनिवार्य करावे…
बलिदानी गोरक्षक गजानन सुरोशे यांना न्याय मिळावा हीच महाराष्ट्रातील समस्त जनतेची प्रामाणिक इच्छा आहे…
गोरक्षक गजानन सुरोशे अमर रहे अमर रहे…