Thursday, September 24, 2026

आसामचा एकशिंगी गेंडा त्याचा त्रिभुवनी झेंडा

Share

आसाम टुरीझमच्या (ATDC) कार्यालयातील फोन वाजतो…

ATDC चे सचिव फोन उचलतात…

हॅलो…

खुद्द मुख्यमंत्री लाईनवर येतात…

हे कळल्यावर सचिव लगबगीने… येस् सर, गुड मॉर्निंग म्हणतात…

गुड मॉर्निंग… गुड मॉर्निंगची देवाणघेवाण झाल्यावर मुख्यमंत्री करड्या आवाजात…

दोन आठवड्यांनी, गुरुवार २४ सप्टेंबर रोजी राज्यात साजऱ्या होणाऱ्या “जागतिक एकशिंगी गेंडा महोत्सवासाठी निमंत्रण पत्रिका छापून आणि  विशेष निमंत्रितांची यादी तयार करून… त्यांना निमंत्रणे रवाना करण्याची सचिवांना सूचना करतात…

सर, निमंत्रण पत्रिकेत मजकूर काय टाकावा?…

सेक्रेटरी, एकशिंगी गेंड्याची सगळी वैशिष्ट्ये टाका… विशेषतः त्यांच्या जाड कातडीचा न विसरता उल्लेख करा… एखाद्या निर्लज्ज आणि निगरगट्ट माणसाला गेंड्याच्या कातडीचा का म्हणतात हे लोकांच्या लक्षात यावे असे वर्णन करा… ३०३ बोअरच्या बंदूकीची गोळीदेखील त्याच्या कातडीतून आरपार जाऊ शकत नाही हे देखील या निमित्ताने लोकांना कळू द्या… बाकी आपल्या राज्याने एकशिंगी गेंड्याच्या संवर्धनासाठी केलेले सगळे उपक्रम पण येऊ दे…

आणि “आसामचा एकशिंगी गेंडा… त्याचा त्रिभुवनी झेंडा” अशी पंच लाईन द्या…

ओके सर, निमंत्रण पत्रिका करून घेतो पण निमंत्रणे पाठवण्यासाठी कोणती नावे अपेक्षित आहेत?… सचिव अतिशय नम्रतेने विचारतात…

देशातील निवडक निमंत्रित मंडळींना बोलवा… धुरंधरच्या सगळ्या टीमपासून बॉलीवूडच्या निमंत्रणाची सुरुवात करा… बॉलीवूडची बाकी नावे तुम्ही ठरवा…

सर, आणि राजकारणातल्या कोणाकोणाला बोलवायचं?…

सेक्रेटरी… काढायला गेलं तर नावं खूप निघतील… पण कार्यक्रमाची शोभा वाढेल असेच नेते बोलवा… आणि ४ दिवसांत निमंत्रणे रवाना करा…

येस् सर… निमंत्रण पत्रिकेचा मजकूर २/३ तासांत तयार होईल… पण निमंत्रितांची यादी बनवायला थोडा वेळ लागेल…

चालेल हो सेक्रेटरी, पण गेंड्याची जाड कातडी आणि महोत्सवाला साजेसे निमंत्रित एवढं विसरू नका…

येस् सर… आणि समोरून फोन कट् होतो…

मुख्यमंत्र्यांच्या… गेंड्याची जाड कातडी आणि महोत्सवाला साजेसे निमंत्रित राजकारणी… या दोन एकत्रित सूचनांमुळे सेक्रेटरींच्या डोक्यात इतका गोंधळ उडतो की…

आपल्या पीएला निमंत्रण पत्रिकेचा मजकूर बनवायला सांगून ते स्वतः निमंत्रितांची यादी बनवायला घेतात…

पाटण्यावरून लालटेन बाबू… लखनौवरून सायकलवाला… कोलकात्याची कैदाशिण… दिल्लीचा कट्टर इमानदार… केरळची लाल माकडं… मुंबईचं लोचट मांजर… बाबरमतीचा जाणता राजा हरिश्चंद्र…

सेक्रेटरींची यादी संपता संपेना…

अन्य लेख

संबंधित लेख