Thursday, October 15, 2026

लव्ह जिहादचा सुकाळ स्पॉन्सरर पुणे सकाळ…

Share

इराण, तुर्कस्तान आणि मध्य आशियातील लोककथांमध्ये नसरुद्दीन होजा हे पात्र अत्यंत लोकप्रिय आहे… अनेक कथांमध्ये त्यांचा उल्लेख एक स्थानिक धार्मिक न्यायाधीश (काझी किंवा इमाम) म्हणून येतो…

आपल्याकडे बिरबलाच्या गोष्टी जशा प्रसिद्ध आहेत तशा तिकडे नसरुद्दीन होजाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत…

त्यातली एक रोचक गोष्ट अशी आहे…

एकदा होजाच्या नोकराने होजाच्या शेजाऱ्याने घराच्या मागच्या परसात नुकत्याच दळलेल्या पीठाचे पोते पाहिले…

नोकराच्या मनात लालसा निर्माण झाली आणि तो रिकामी पिशवी घेऊन… कुंपणावरून उडी मारून शेजाराच्या परसात गेला…

आणि शेजाऱ्याच्या पोत्यातले पीठ आपल्या पिशवीत भरू लागला…

एवढ्यात शेजाऱ्याने होजाच्या नोकराला पकडले…

बाचाबाची सुरू झाली… आवाज ऐकून होजा पुढे सरसावला आणि माफी मागत शेजाऱ्याला म्हणाला…

माझा नोकर थोडासा वेडसर आहे… त्याला अधूनमधून वेडाचे झटके येतात आणि झटका आला की तो असे चाळे करतो…

रागाने लालबुंद झालेल्या शेजाऱ्याने होजाला दरडावत विचारले…

तो वेडा आहे तर वेडाच्या झटक्यात तो तुमच्या घरातले पीठ आणून माझ्या पोत्यात का टाकत नाही?…

होजा शांतपणे म्हणाला… तुम्हाला वाटतंय तेवढा तो वेडा नाहीये…

त्याच नसरुद्दीन होजाचे वंशज सध्या पुणे सकाळमध्ये बातमीदार आहेत…

नवरात्रीत गरबा खेळतानाच्या त्यांनी टाकलेल्या फोटोत… पुरुष मुसलमान आहेत आणि महिला हिंदू…

तुम्ही “लव्ह जिहाद”ला  प्रोत्साहन देता आहात… हिंदू पुरुष आणि मुस्लीम महिला असा फोटो का नाही टाकला?…  म्हणून जेव्हा हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फोन करून जाब विचारला तेव्हा…

“नवरात्रात तरुण तरुणींचा सहभाग” असा प्रॉम्प्ट दिल्यावर AI ने

तो फोटो दिला म्हणून साळसूदपणाचा आव आणला…

बरं AI ने आपणहून असा फोटो दिला असेल तरी टाकून छापलात तुम्हीच ना?… की तुमचा सगळा पेपर AIच आपोआप छापतं… असं विचारल्यावर हळूच आतल्या पानावर छोटीशी दिलगिरी व्यक्त करून मोकळे झाले👇👇…

आणि आता तर हिंदुत्वप्रेमी नागरिकांनी अजून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू नयेत म्हणून मोबाईल बंद करून बसले आहेत…

इराणचा नसरुद्दीन होजा न्यायाधिश होता त्यामुळे निर्भिड होता…

त्याचे पुणे सकाळमधील वंशज डरपोक आणि भ्याड आहेत… हे या निमित्ताने सकल हिंदू समाजाला कळले…

अन्य लेख

संबंधित लेख