Sunday, December 22, 2024

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका

Share

सोलापूर : भाजपच्या (BJP) आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (MLA Ranjitsinh Mohite-Patil) यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले विधानपरिषदेचे आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आमदार रणजितसिंह पाटील यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये मोहिते पाटील यांना सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर आठ मुद्दे उपस्थित करून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

  • रणजीतसिंह पाटील यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये नेमंक काय म्हटलंय पहा

प्रति, रणजीतसिंह मोहिते पाटील आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र

विषय – पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस…

महोदय,
आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक विषयात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

1) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारात्ताठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती.

2) लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपाच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले.

3) पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपाच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले.

4) आपल्या कार्यकरर्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनात आले.

5) लोकसभा निवडणूक मतदानाध्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपा विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले.

6) विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचे निदर्शनास आले.

7) महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबीय कडून आपण राष्ट्रवादी शरदबंद्र पवार गटाचा प्रचार केला तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले.

8) पोलिंग एजंटला आपल्या कार्यकत्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील सात दिवसात लेखी स्वरुपात सादर करावे…

वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील सात दिवसात लेखी स्वरुपात सादर करावे.

आता, रणजीतसिंह मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार, कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना सोशल मीडियावर पोस्ट टॅग करतं पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उचल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दिलेल्या धमक्या याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहोत. पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच,” म्हणत, पक्षाचे आभार मानले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख