Tuesday, August 4, 2026

दहशतवाद विरोधातील कठोर धोरण आणि पाकिस्तानची उघडी पडलेली भूमिका

Share

अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तैबाशी संबंधित रिझवान हनीफ हा गेल्या काही वर्षांत आपल्या संघटनेच्या ३० हून अधिक सदस्यांचा पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील विविध भागांत मृत्यू झाल्याचे दु:ख व्यक्त करताना तो विहळताना दिसत आहे. त्याने या आपल्या सहकारी दहशतवाद्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणांनी खात्मा केल्याचे म्हटले आहे. या वक्तव्याने दहशतवादी संघटनांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेकडे आणि भीतीच्या वातावरणाकडे लक्ष वेधले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणानी दहशतवाद्याच्या कंबरडे मोडल्याचे प्रत्यक्ष साक्ष त्याच्या व्हिडीओमधुन दिसत आहे.

भारतातील केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत दहशतवादा विरोधात अधिक आक्रमक आणि बहुआयामी भूमिका स्वीकारली आहे. सीमावर्ती सुरक्षा, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, दहशतवादी वित्तपुरवठ्यावर निर्बंध, तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर वाढवलेला राजनैतिक दबाव यामुळे दहशतवादी संघटनांवर दबाव वाढल्याचे अनेक सुरक्षा विश्लेषक मानतात. या धोरणांचा उद्देश भारतावरील दहशतवादी धोके कमी करणे हा आहे. रिझवान हनीफच्या वक्तव्यात जर त्याने सांगितल्याप्रमाणे संघटनेतील सदस्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असेल, तर ती दहशतवादी नेटवर्कसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो. कोणत्याही दहशतवादी संघटनेची ताकद तिच्या दहशतवाद्याच्या आत्मविश्वासावर अवलंबून असते. जेव्हा त्यांनाच स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल शंका वाटू लागते, तेव्हा संघटनात्मक क्षमता आणि मनोबलावर परिणाम होतो. तो परिणाम झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाकिस्तानने अनेकदा आपल्या भूमीवर दहशतवादी संघटना सक्रिय नसल्याचा दावा केला आहे, पण अशा संघटनांशी संबंधित व्यक्तींची सार्वजनिक वक्तव्ये आणि त्यांच्या उपस्थितीबाबतची जाहीर कबुली दिल्यामुळे पाकिस्तानाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. लष्कर-ए-तैबा ही संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे.


या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश जगभरात गेला आहे. दहशतवादाविरोधातील लढा हा केवळ सीमेवरील संघर्षाने संपणार नाही. तर तो गुप्तचर क्षमता, राजनैतिक प्रयत्न, आर्थिक निर्बंध आणि सुरक्षा व्यवस्थेच्या समन्वयामुळे संपेल. दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण होणे हा सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा परिणाम आहे. मोदी सरकारने व्युहरचना आणि कठोर भुमिकाचा परिपाक आहे. भारताने दीर्घकाळ दहशतवादाचा सामना केला आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील कारवाईचे उद्दिष्ट मोदी सरकारने गाठले आहे. मोदी सरकार लवकर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला समुळ नष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे भारतीय नागरिकांचे संरक्षण होईल, दहशतवादी जाळे निष्प्रभ होऊन राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत होईल. हे स्पष्टपणे दिसत आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख