Thursday, October 10, 2024

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले

Share

मुंबई : वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली होती. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

किरीट सोमय्या संजय राऊतांना फटकारले आहे ते म्हणाले, “पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायाचा आणि हिंदूत्वाचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात. लालबागच्या राजाचे अमित शहा दर्शन करतात आणि संजय राउत उर्फ उद्धव ठाकरे हे त्याचा निषेध करतात. वोट जिहादसाठी आणि मुस्लीम मतांसाठी अशा प्रकारे गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख