Saturday, September 7, 2024

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि…

Share

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडले. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. शेवटी त्यांनी ट्विट मध्ये फिर से #खेलाहोबे ! नजर ठेवा!  म्हणत त्यांनी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. कंबोज यांनी ट्विट इंग्रजी मध्ये केलंय. मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख