Saturday, January 17, 2026

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे

Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण? यावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत, “मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

देवेंद्रजींच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास
भाजपने १३५ जागा लढवून तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला आहे. या यशावर बोलताना नितेश राणे म्हणाले, “आम्ही निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच सांगितले होते की, मुंबईत ‘आय लव्ह महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ विचारांचा हिंदू मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल. मुंबईकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि महायुतीच्या सहकाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. आता लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल.”

“राणे का घर तो तोडा नही, अभी तेरे मातोश्री-२ की बारी है!”
उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना नितेश राणे यांनी जुन्या संघर्षाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास करण्यासाठी नव्हे, तर विरोधकांची घरे तोडण्यासाठी पालिकेच्या सत्तेचा वापर केला. ते मुख्यमंत्री असताना रोज आयुक्तांना फोन करून ‘राणे का घर तोडो’ सांगायचे. आज मी त्यांना सांगू इच्छितो-राणे का घर तो तोडा नही, अभी तेरे मातोश्री-२ की बारी है!”

२५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग
मुंबई महापालिकेत सत्तेचा आकडा ११४ आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या असून शिंदे गटाच्या २९ जागांच्या मदतीने महायुती सहज बहुमताचा आकडा पार करत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईत प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखालील युती सत्तेत येत असल्याने हे ‘सत्तांतर’ राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख