Tuesday, September 22, 2026

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर

Share

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. राज्यात 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. निवडणूक आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याकरिता उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज ही करावी लागणार आहेत.

अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपकडून शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांचे नाव चर्चेत…तर काँग्रेसकडून ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांची सून आदिती पोहरे यांचं नाव चर्चेत आहे. भाजपा या निवडणुकीत तयारीने उतरत आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. याबाबत लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल.

अन्य लेख

संबंधित लेख