Thursday, September 3, 2026

सरकारच्या आश्वसनानंतर मनोज जरांगेची चर्चेची भूमिका, उपोषण सुरुच राहणार

Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा बुधवारी ५ वा दिवस होता. मराठा आरक्षण मागणीतील सर्व त्रुटी दूर करून ५८ लाख नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊ तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीला कार्यालय देण्याच्या मागणीसह जरांगे यांच्या सर्व अटी मान्य असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना सांगितले

https://twitter.com/PrasadLadInd/status/2095158956591354157/video/1

“मी फक्त तुमच्या शब्दाचा मान ठेवून उठून बसलो आहे, नाहीतर मंत्री आले तरी मी मोजत नाही,” असे सांगत जरांगे यांनी मुंबईत येऊन बाकीच्या गोष्टी नीट करण्याचा इशारा दिला.

प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, “रद्द झालेली चार प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही,” असा इशारा सरकारला दिला. सध्या फक्त पाणी पिऊन आणि सलाईन लावून आंदोलन सुरू ठेवणार असून सरकारला ४ दिवसांची मुदत दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसाद लाड साहेब खूप तळमळ करत आहेत, पण आपले आरक्षण फक्त ‘श्रेयात’ गुंतले आहे. त्यामुळे आपल्याला आता वेगळी आणि कठोर लढाई करावी लागेल, असे ते म्हणाले.

उद्या जर हैदराबाद गझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर आम्ही फुले उधळू. सातारा आणि कोल्हापूर गझेटियरनुसार सरकारने तात्काळ जीआर काढावा आणि त्याची अंमलबजावणी 3 महिन्यांनंतर करावी. चार रद्द झालेले प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.  राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, “विखे पाटील कधीच खरे बोलत नाहीत

जालना, बीड, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत आंदोलने तीव्र झाली असून, काही ठिकाणी महामार्गावर टायर जाळून    ‘रास्ता रोको’ व ‘ठिय्या’ आंदोलने करण्यात आली आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख