नजीकच्या काळात राज्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी संख्येने पदे भरली जातील. असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
व्यक्त केला.
अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती राज्याचा दौरा करत असून, विद्यार्थी व संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेत आहे. वर्णनात्मक पद्धतीऐवजी बहुपर्यायी (वस्तुनिष्ठ) स्वरूपात परीक्षा घेण्याची मागणी होत आहे; समितीच्या शिफारशींच्या आधारे विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. अशी ग्वाही त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे.
‘गट-क’ (Group ‘C’) सह सर्वच श्रेणींमधील पदे विक्रमी संख्येने भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करायची की ही भरती MPSC द्वारे करायची, याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.