ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहेत तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपा (BJP) महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला. मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार. ‘घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयापैकी हा एक निर्णय आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभा असेल किंवा विधानसभा आम्हाला विचारले, समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोलत आहे”, असे आमदार राजू पाटील म्हणाले.