Tuesday, February 24, 2026

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

Share

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये सुविधा

आरोग्य विभागाच्या सूक्ष्म नियोजनानुसार, सातारा जिल्ह्यातील विविध उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील केंद्रांचा समावेश आहे. कराड, फलटण, महाबळेश्वर, वाई, पाटण, मेढा, सोमर्डी, उंडाळे, वडूज, गोंदवले, औंध, कोरेगाव, कलेढोण, पिंपोडा, ढेबेवाडी, खंडाळा आणि काशिळ येथील रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मिळणाऱ्या आरोग्य सुविधा:

या मोफत शिबिरांमध्ये नागरिकांसाठी विविध तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:

१. सर्व प्रकारच्या रुग्ण आणि प्रयोगशाळा तपासण्या.

२. इसीजी (ECG) आणि कॅन्सर स्क्रीनिंग (कर्करोग तपासणी).

३. आभा (ABHA) कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सुविधा.

४. विविध रोगांवर मोफत औषधोपचार.

या उपक्रमाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख