राणीसावरगाव (परभणी) : “जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमद् जगद्गुरू पलसिध्द धर्मपीठ, साखरखेर्डा येथील परमपूज्य ब्रह्मलिंग १०८ सद्गुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सह-प्रांत प्रचारक श्री. राजेंद्रजी कोळपे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला ह.भ.प. विजयानंद महाराज (सुपेकर) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
हा सोहळा गुरुवार, २६ मार्च रोजी श्री हनुमान मंदिर बस स्टँड आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर (शिवतीर्थ) येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
श्रीराम जन्मोत्सव: दुपारी १२:०० वाजता
विशाल हिंदु संमेलन: दुपारी १:०० ते ३:०० वाजता
प्रसाद वाटप: दुपारी ३:०० ते ५:०० वाजता
भव्य शोभायात्रा: सायंकाळी ५:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत
“एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम” या घोषणेसह हिंदू समाजाला संघटित करणे आणि नवचैतन्य निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. राणीसावरगाव आणि परिसरातील हजारो भाविकांनी व हिंदूंनी या संमेलनात आणि शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.