Thursday, March 26, 2026

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

Share

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे.

हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८ चैत्र शु एकादशी रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता चिंचवड येथील श्री मोरया गोसावी क्रीडांगण (केशवनगर) येथे संपन्न होईल. या सोहळ्याला आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रमुख मार्गदर्शक: ह.भ.प. श्री चिदंबरेश्वर महाराज (साधकाश्रम, आळंदी) हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

श्री महंत योगी दिग्विजयनाथजी महाराज (आळंदी), चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव, श्री ईश्वरबुवा रामदासी उर्फ दादामहाराज (सांगली) आणि ह.भ.प. श्री नारायण महाराज गाडेकर (आळंदी) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

“हिन्दवः सोदराः सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्। मम दीक्षा हिन्दू रक्षा, मम मंत्रः समानता” या ब्रीदवाक्याला स्मरून हिंदू समाजातील समानता आणि एकतेचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. हिंदू जागरणाचे हे कार्य सामाजिक परिवर्तनासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

“आपल्या महान संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी या संमेलनास सर्व हिंदू बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे,” असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख