Friday, June 5, 2026

कुंभमेळ्याच्या आयोजनातून “परिवहन”ला मिळणार 4500 बसेस

Share

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नसून वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास आणि आपत्कालीन सेवांच्या दृष्टीने एक मोठे प्रशासकीय आव्हान असते.


2015 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन यावेळी प्रशासनाने अधिक व्यापक आणि आधुनिक पद्धतीने नियोजन सुरू केले आहे. भाविकांची वाढती संख्या, शहरातील मर्यादित रस्ते क्षमता आणि अमृत स्नानाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी यांचा विचार करून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण (NTKMA) ने वाहतूक व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. याच पार्श्वभूमीवर 2027 च्या सिंहस्थासाठी तब्बल 4,500 बसांचे विशाल सार्वजनिक वाहतूक नेटवर्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे.या योजनेचा मुख्य उद्देश भाविकांना सुरक्षित, सुलभ, जलद आणि किफायतशीर प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शहराबाहेरील पार्किंग केंद्रे, शटल बस सेवा, रेल्वे स्थानकांशी जोडलेले वाहतूक जाळे आणि पादचारी क्षेत्रांची निर्मिती यांद्वारे भाविकांचा अधिक सुलभ व्हावा.प्राधिकरणाच्या नियोजनानुसार नाशिक शहरात दररोज 33 लाखांहून अधिक भाविक प्रवास करू शकतील. त्यासाठी 46 बाह्य वाहनतळ, 5 प्रमुख रेल्वे स्थानकांचे एकत्रीकरण, हजारो बसांच्या शटल सेवा आणि GPS आधारित रिअल-टाइम नियंत्रण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर, व्यापक वाहतूक नियोजन आणि बहुआयामी व्यवस्थापन यांच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळा 2027 अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. आगामी सिंहस्थ पर्वात कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान कोट्यवधी भाविकांच्या वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (NTKMA) तब्बल 4,500 बसांचे विशाल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची योजना आखली आहे. देशातील कोणत्याही धार्मिक सोहळ्यासाठी उभारल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या तात्पुरत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी ही एक मानली जात आहे. परंतु या बसेस 4500 बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नवीन खरेदी करणार आहे. नाशिक कुंभ मेळाव्याच्या निमित्ताने एसटी महामंडळामध्ये नवीन साडेचार हजार बस दाखल होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीला अधिक गुणवत्ता आणि प्रवाशांसाठी अधिक बस उपलब्ध होणार आहेत. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देत असतो. हेच यावरून सिद्ध होत आहे.या नेटवर्कमध्ये रस्तेमार्गे येणाऱ्या भाविकांसाठी 3,000 बसांची तर रेल्वेमार्गे नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी 1,500 बसांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बस विविध मार्गांवर सतत फेऱ्या मारून भाविकांना पार्किंग क्षेत्रे, रेल्वे स्थानके आणि धार्मिक स्थळांदरम्यान सुरक्षितपणे पोहोचवतील. या व्यवस्थेमुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

विशेष म्हणजे या संपूर्ण वाहतूक जाळ्याद्वारे दररोज 33 लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख