अवघे २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेले जनजातीय लोकनायक बिरसा मुंडा यांचा आज ९ जून रोजी बलिदान दिन आहे…
त्यावेळच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये… आणि आजच्या झारखंड राज्यात बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी आजच्या झारखंड राज्याच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहातु या गावी… सुगना मुंडा आणि करमी मुंडा या दाम्पत्याच्या पेटी झाला…
त्यांचा जन्म गुरुवारी (बृहस्पतिवार) झाल्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नाव ‘बिरसा’ ठेवण्यात आले…
बिरसांना शिक्षणाची आवड होती… सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या जनजातीय व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात…
पुढे १८८६ साली बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले… तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला… शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा जनजातीयांबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला… तेव्हा बिरसांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले… त्यामुळे १८९० साली बिरसांना शाळेतून काढण्यात आले…
पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला… आणि ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे, अशी लोकजागृती ते करू लागले… त्यामुळे ते “भगवान बिरसा” म्हणून ओळखले जाऊ लागले…
१८९४ मध्ये जनजातीय भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला… इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती… उलट, इंग्रजांनी जनजातीय बांधवांकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली… त्यामुळे अनेक जनजातीयांना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या… भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे त्यांना अशक्य बनले… जमीनमालकी असणारा जनजातीय भूमिहीन व वेठबिगार बनला… त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध जनजातीय तरुण बांधवांचे संघटन केले… समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल, असे बिरसा सांगत… त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले… इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत… बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले… त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरविले… २६ ऑगस्ट १८९५ रोजी ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले… बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा जनजातीय समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला… अखेर ३० नोव्हेंबर १८९७ रोजी ब्रिटीशांना बिरसांची सुटका करावी लागली…
गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या… त्यामध्ये सुमारे ५,००० जनजातीय बंधू सामील झाले… बिरसांनी कायद्याची लढाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व विशेषतः ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली… सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीस चौक्या जाळण्यात आल्या… तसेच चर्चेसवर देखील हल्ले केले गेले…
या मुक्तीआंदोलनाला मुंडारी भाषेत ‘उलगुलान’ असे म्हणतात…
या आंदोलनात जनजातीय बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला… पोलिसांच्या गोळीबारात शेकडो मुंडा बांधव व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे बरेचसे पोलीस मारले गेले…
मात्र या आंदोलनाने सगळ्यात जास्त अस्वस्थ झाले ते ख्रिश्चन धर्मप्रसारक… कारण बिरसा मुंडा चर्चच्या धर्मांतराच्या (conversion) मार्गातील एक खूप मोठा अडथळा ठरत होते… खुद्द ख्रिश्चन धर्मातील
अनेक जनजातीयही उलगुलानमध्ये सामील होऊ लागले होते…
अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला… बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे (सव्वाशे वर्षांपूर्वीचे ५०० रुपये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे) बक्षीस ठेवण्यात आले… पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली… ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले…
रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला… तेथेच त्यांचे ९ जून १९०० रोजी निधन झाले…
बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली… १९०२ साली ब्रिटिशांनी ‘छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट’ मंजूर करून जनजातीयांचे जमिनीवरील हक्क मान्य केले… जनजातीयांचे-हक्क आणित्यांच्या ख्रिस्तीकरणाला प्राणपणाने विरोध करणारा पहिला जनजातीय नेता म्हणून बिरसा मुंडा यांची ओळख आहे.
रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाथी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे… तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे…
२०२१ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढाकाराने बिरसा मुंडा यांचा जन्मदिन… “जनजातीय गौरव दिवस” म्हणून साजरा केला जातो…
जुलमी ब्रिटिश सत्तेला आणि धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांना प्राणपणाने विरोध करूनस्वातंत्र्यासाठी व स्वधर्मासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या… जननायक बिरसा मुंडा यांना बलिदान दिनी शतशत वंदन🙏🙏
धर्म हमारा जग में अभिनव, अक्षय है अविनाशी हैं
इसी कडी से जुडे हुए, युग युग से भारतवासी हैं
थाय अथाह जहां की महिमा, गहरा जैसे सिंधु हैं…
संस्कृति सब की एक चिरंतन खून रगों में हिंदू है।
🙏🙏🚩🚩🌹🌹