Thursday, July 16, 2026

सोशल मीडियातून भारतीय तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ATS ची शहजाद भट्टी प्रकरणात मोठी कारवाई

Share

डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. तपास यंत्रणांच्या मते, त्याचा वापर गुन्हेगारी, कट्टरतावादी प्रचार, आर्थिक प्रलोभने आणि देशविघातक कारवायांसाठीही होऊ शकतो. अशाच पार्श्वभूमीवर पाकिस्तानस्थित दहशतवादी शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यभर मोठी तपास मोहीम राबविली आहे.


शहजाद भट्टी कोण?
शहजाद भट्टी हा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी नेटवर्कचा प्रमुख असून भारतीय तपास यंत्रणा त्याच्या सोशल मीडिया नेटवर्कची चौकशी करत आहेत. अधिकृत तपासात त्याच्यावर भारतीय तरुणांशी ऑनलाइन संपर्क वाढविण्याचा आणि त्यांना विविध प्रलोभने देण्याचा आले आहेत. महाराष्ट्र ATS ने या प्रकरणात राज्यभर समन्वित मोहीम राबवली.सुमारे १०२ संशयितांची ओळख पटविण्यात आल्याचे अधिकृत तपासात समोर आले आहे. राज्यभर ५८ ATS पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. मराठवाड्यातील १५ संशयिताचा तपास चालू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये घरांची झाडाझडती, डिजिटल उपकरणांची तपासणी आणि चौकशी करण्यात आली.


पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ATS ने विशेष मोहीम राबवली. ६६ जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले किंवा त्यांची चौकशी करण्यात आली. सुमारे ६५ ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट, चॅट्स आणि डिजिटल उपकरणे तपासासाठी जप्त करण्यात आली.


शहजाद भट्टी प्रकरणाचा तपास केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून त्याचे समन्वयन नागपूर ATS युनिटकडूनही करण्यात आले. महाराष्ट्र ATS ने राज्यभर एकाच वेळी छापेमारी आणि चौकशी मोहीम राबवली. तपासादरम्यान शहजाद भट्टीच्या कथित ऑनलाइन नेटवर्कशी संबंधित १०२ संशयितांची ओळख पटविण्यात आली असून राज्यभर विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाया करण्यात आल्या. ATS खालील मुद्द्यांची तपासणी करत आहे. सोशल मीडियावरील संपर्क WhatsApp, Instagram, Facebook, X, आदी माध्यमांवरील संवाद, संपर्क झालेल्या मुलांसोबत पाकिस्तानमधून आर्थिक व्यवहार झाले का? मोबाईलमधील चॅट, फोटो आणि डिजिटल पुरावे कोणाला देशविघातक किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त करण्यात आले का?


राष्ट्रीय सुरक्षेसाठी धडा
सोशल मीडिया हा राष्ट्रीय सुरक्षेचाही विषय बनू शकतो. ऑनलाइन मैत्री किंवा अनोळखी व्यक्तींशी संपर्क धोकादायक ठरू शकतो. तरुणांनी आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. पालकांनी मुलांच्या ऑनलाइन वापरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजामध्ये सायबर सुरक्षा व डिजिटल साक्षरतेबाबत जनजागृती आवश्यक आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख