तुम्ही गाडी चालवत आहात आणि समजा तुमच्या समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक लावले… आणि तुमच्या गाडीने आपोआप ब्रेक लावले आणि टक्कर टळली… तर हमखास ही तुमच्या वाहनात बसवलेल्या एका लहान रडारची जादू आहे…
गाडीत बसवलेले हे रडार आजूबाजूच्या वाहनांवर आणि वस्तूंवर सतत लक्ष ठेवते…
गाडीत बसवली जाणारी रडार सिस्टीम ही दोन फ्रिक्वेन्सीची असते…
पहिला प्रकार म्हणजे… २४ GHz (24 GHz) रडार सिस्टीम… ही जुनी आणि कमी अंतरासाठी (५ ते १०० मीटर) वापरली जाणारी फ्रिक्वेन्सी आहे… याचा वापर प्रामुख्याने ब्लाइंड स्पॉट
मॉनिटरिंग (अंधाऱ्या जागेतील वाहने शोधणे) आणि पार्किंगसाठी केला जातो…
दुसरी ७७ GHz (76 – 81 GHz) सिस्टीम… ही सर्वात अचूक आणि आधुनिक फ्रिक्वेन्सी आहे… याचा वापर लांब अंतरावरील (२५० मीटरपर्यंत) अडथळे शोधण्यासाठी आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) साठी होतो…
गाडीत टक्कर टाळणारे (Collision Avoidance) रडार सर्वप्रथम इटन कॉर्पोरेशन (Eaton Corporation) या अमेरिकन कंपनीने १९९० च्या दशकात व्यावसायिकरित्या वापरले होते… त्यांनी ट्रक चालकांसाठी ‘कोलिजन वॉर्निंग सिस्टीम’ (Collision Warning System) नावाचे रडार युनिट बाजारात आणले होते…
नंतरच्या काळात मर्सिडीज-बेंझ आणि होंडा या वाहन उत्पादक कंपन्यांनी प्रवासी कारमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला…
नवीन वाहनांमधील सर्व स्मार्ट वैशिष्ट्ये या रडारद्वारे चालवली जातात… जसे की, टक्कर होण्यापूर्वी सूचना देणे, स्वयंचलित ब्रेकिंग, मागून येणाऱ्या वाहनांविषयी सतर्क करणे आणि महामार्गावर वाहनाचा वेग आपोआप नियंत्रित करणे… यात रडार, लेझर आणि कॅमेऱ्या यांचा एकत्रित वापर होतो… हे रडार चालकाच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे काम करते…
भारतात टक्कर टाळणाऱ्या रडार तंत्रज्ञानाचा वापर ‘Advanced Driver Assistance Systems’ (ADAS) म्हणून केला जातो… हे रडार आणि कॅमेरा तंत्रज्ञान पुढील अपघातांचा अंदाज घेऊन आपोआप ब्रेक लावते किंवा ड्रायव्हरला सतर्क करते… भारतातील महिंद्रा… टाटा मोटर्स… ह्युंदाई… किया… होंडा… मारुती सुझुकी आणि एमजी या मोटार निर्मिती कंपन्या आपल्या निवडक मॉडेल्समध्ये हे तंत्रज्ञान वापरतात…
मात्र हे आधुनिक रडार हे त्याच्या ७७ GHz (76 – 81 GHz) फ्रिक्वेन्सीमुळे एक वायरलेस उपकरण मानले जात होते… त्यामुळे त्यासाठी परवान्याची आवश्यकता लागू होती…
दूरसंचार विभागाने ११ जून, २०२६ रोजी एक नवीन नियम जारी केला आहे… आता, वाहनांमध्ये बसवलेल्या या रडारसाठी परवान्याची आवश्यकता राहणार नाही…
त्यामुळे वाहनांसाठी सुरक्षा कवच असलेली ही रडार सिस्टीम आता वाहनांमध्ये बसवणे, साठवणे आणि विकणे हे सर्व परवान्याशिवाय करता येईल…
हा नियम कार, बस, ट्रक, बाईक, स्कूटर आणि अगदी ट्रेनलाही लागू होईल…
परवान्याच्या समस्यांमुळे कंपन्यांना ही वैशिष्ट्ये भारतात आणणे अवघड आणि खर्चिक होते… परिणामी, ही वैशिष्ट्ये केवळ उच्च श्रेणीच्या वाहनांमध्येच उपलब्ध होती… हे तंत्रज्ञान देशात सहजपणे समाविष्ट व्हावे आणि प्रत्येक वाहनासाठी उपलब्ध व्हावे, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे… त्यामुळे, परवान्याची अट काढून टाकण्यात आली आहे…
आता कंपन्यांना आपल्या सर्व गाड्यांना हे सुरक्षा कवच देणे स्वस्त पडेल… अशी अपेक्षा आहे की भविष्यात अगदी कमी किमतीच्या गाड्यांमध्येही हे आधुनिक रडार असेल… यामुळे रस्त्यावरील अपघात कमी होतील, कारण वाहन धोका आधीच ओळखू शकेल आणि चालकाचे संरक्षण करू शकेल…
मात्र राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने या सवलतीसोबत काही अटी घातल्या आहेत… रडारने एका विशिष्ट मर्यादेतच काम केले पाहिजे… जर त्यामुळे इतर वायरलेस प्रणालींमध्ये अडथळा येत असेल, तर सरकार ते काढून टाकण्याची किंवा त्याची शक्ती कमी करण्याची कारवाई करू शकते… कंपन्यांनी त्यांच्या उपकरणांसाठी सरकारी पोर्टलवर मंजुरी घेणे आवश्यक आहे…
एकंदरीत देशातील अपघात टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे असेच म्हणावे लागेल…