शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने जंतर-मंतर वरील कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले…
हे आंदोलन जेन झी (Gen Z)च्या विद्यार्थ्यांचे होते असे सांगण्यात आले…
जेन झी म्हणजे १४ ते २९ वयोगटातील युवक युवती…
त्यांचा उत्साह (enthusiasm) खरोखरच वाखाणण्यासारखा असतो… कारण तो वयोगटात तसा आहे…
जेन झी ही सोशल मीडियाच्या जमान्यात जन्मलेली आणि सोशल मीडियामध्ये रमणारी पिढी आहे…
त्यामुळे सोशल मीडियावर… विशेषतः इंस्टाग्राम (instagram) वर दाखवली जाणारी रिल्स हेच जवळपास त्यांचे भावविश्व झाले आहे…
या रिल्समधील… विशेषतः स्टँड अप कॉमेडी मधली भाषा ही अनेक वेळा सॉफ्ट पॉर्न (soft porn) कडे झुकलेली असते…
सहाजिकच त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या जेन झीवर देखील होत असतो…
आंदोलनाच्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या अर्वाच्य घोषणा आणि हातात धरलेल्या प्लॅकार्डस् (placards) वरील अश्लील मजकूर त्याची साक्ष देतो…
मानवी शरीराचा कमरेखालच्या एकाही अवयवाचा आणि एकाही पवित्र नात्यांचा त्यांनी बिभत्स शब्दांत उल्लेख करायचा सोडला नाही…
जेन झीचे युवक तर युवक… युवतींच्या तोंडातील शिवराळ आणि अश्लील भाषेने व हातात धरलेल्या प्लॅकार्डस् वरच्या अर्वाच्य अशा मजकुराने…
संजय राऊत यांना देखील लाज वाटावी अशी परिस्थिती होती…
आपल्या अनेक माता भगिनींच्या कानाचे पडदे फाटले असतील…
कारण हा सगळा तमाशा खुलेआम टीव्ही चॅनेल्सच्या कॅमेरासमोर… रेकॉर्डिंग करणाऱ्या मोबाईलस् समोर चालला होता…
ना कोणती भीती… ना कोणती लाज… ना शरम…
सगळं जग बघतंय… आपले आई-वडील देखील बघताहेत… याची तीळमात्र पर्वा या युवती करत नव्हत्या…
म्हणजे आमची जेन झी सुशिक्षित आहे पण किमान सुसंकृत नाही असे खेदाने म्हणावे लागते…
आणि हे सगळं कोणाबद्दल?… तर जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांबद्दल?…
खरं तर आज आपल्या पंतप्रधानांचे वय हे जेन झीच्या आजोबांच्या वयाएवढे आहे… पण कोणतीही लाज शरम बाळगण्यात आली नाही…
त्यातील काही जण तर आपल्या इंस्टाग्राम हँडलसाठी रिल्स बनवायला आले होते… अधिक लाईकस् अधिक व्ह्यू मिळण्याच्या नादात त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेले दिसत होते…
सरकार विरुद्ध निदर्शने आंदोलन आपण समजू शकतो… त्यातील निषेधच्या घोषणा समजू शकतो… वयोमानानुसार त्यातील उत्साह देखील समजू शकतो…
पण हा उत्साह… विशेषतः तथाकथित विद्यार्थिनींमधला अतीउत्साह जेव्हा बेभान होऊन… अमर्याद अश्लील भाषेचा वापर करू लागतो… तो देखील देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध
उच्छृंखलपणाच्या सर्व मर्यादा ओलांडतो… त्यावेळी…
देशाच्या संपूर्ण जेन झीची हीच हिडीस मानसिकता आहे का? असा प्रश्न पडतो…
जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर ती संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे…
महाराष्ट्रात विद्यार्थिनींची ओळख काही पुरोगामी लिब्रांडू मंडळींकडून “सावित्रीच्या लेकी” म्हणून सांगितली जाते…
तर मग जंतर-मंतरवर पंतप्रधानां विषयी अश्लील भाषा तोंडात असलेल्या या तथाकथित जेन झीच्या विद्यार्थिनींना देखील सावित्रीच्या लेकी म्हणूनच ओळखायचे का?…
की यांना “फातिमाच्या लेकी” म्हणायचे?…
मात्र संपूर्ण जेन झी अशा विकृत मानसिकतेची आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही… जंतर-मंतरवर देशाने पाहिलेली जेन झी अगदी मोजून मूठभर आहे… त्याच्यावरून संपूर्ण जेन झीची पारख करता येणार नाही…
बहुसंख्य जेन झी ही सध्या अभ्यासात गुंतली आहे…
आपले आणि आत्मनिर्भर भारताचे भवितव्य घडवण्यासाठी…