Friday, August 14, 2026

उर्दू जबान पाकिस्तान के गले की हड्डी

Share

१४ ऑगस्ट १९४७…

आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर विभाजन करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली…

भौगोलिक दृष्ट्या जगाच्या नकाशावर बंगाली भाषिकांची बहुसंख्या असलेला पूर्व आणि पंजाबी वर्चस्व असलेला पश्चिम इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असे दोन भूखंड देश म्हणून नव्याने निर्माण झाले…

बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले…

२४ मार्च १९४८ रोजी ढाका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी एक ऐतिहासिक भाषण केले… ह

समोर बसलेल्या बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना आणि पूर्व पाकिस्तानच्या बंगाली भाषिक जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी…

“पाकिस्तानची राष्ट्रभाषा फक्त आणि फक्त उर्दूच असेल” असे ठणकावून सांगितले…

आणि सगळ्यात मोठी विडंबना म्हणजे हे भाषण त्यांनी इंग्रजीतून केले…

कारण बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांना उर्दू आणि इंग्रजी सोडून तिसरी भाषा बोलता येत नव्हती…

पण पूर्व पाकिस्तानच्या बंगाली जनतेला बंगाली सोडून दुसरी भाषा कळत नव्हती…😂🤣

बोलणारा काय बोलला आणि ऐकणारा काय समजला हे पुढे २३ वर्षांनी…

१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशच्या निर्मितीमुळे स्पष्ट झाले…

उर्दूच्या अस्मितेवर बंगाली अस्मितेने माफ केली आणि पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला…

आज ५५ वर्षांनी बलुच अस्मितेने उर्दू अस्मितेवर मात केली आहे…

आणि ११ ऑगस्ट २०२६ रोजी बलुचिस्तानने आपले स्वातंत्र्य जाहीर केले आहे…

इस्लामच्या आधारावर उभ्या केलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती किती तकलादू आणि कुचकामी होती हे काळानेच स्पष्ट केले आहे…

आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन ही अश्वत्थाम्याच्या माथ्यावरच्या भळभळत्या जखमेसारखी आमच्या आत्म्यावरची भळभळती जखम आहे…

आणि त्याच्यावरती एकच औषध आहे… एकच मलम आहे “अखंड भारत”…

“दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे।

गिलगित से गारो पर्वत तक आज़ादी पर्व मनाएँगे॥

उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें।

जो पाया उसमें खो न जाएँ, जो खोया उसका ध्यान करें॥”

भारत माता की जय🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🌹🌹💐💐

अन्य लेख

संबंधित लेख