Wednesday, August 12, 2026

महाआयटीतर्फे मराठी भाषा विभागाच्या ७ संकेतस्थळांचे नूतनीकरण 

Share

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि या विभागाशी संलग्न असलेले बाकीची  चार प्रमुख सरकारी कार्यालय, यांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahaIT मार्फत त्यामध्ये सुधार करून अद्ययावत करणाचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व संकेतस्थळे आता नव्या प्रकारे कार्यान्वित करण्यात आली असून नागरिक, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी ती पुन्हा उपलब्ध झाली आहेत. आवश्यक प्रणाली आधुनिक करण्यात येत असल्याने ही संकेतस्थळे काही काळासाठी तात्पुरती उपलब्ध नव्हती. या नव्या संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

या सात पोर्टल विषयी व त्यांच्या बदला विषयी संक्षिप्त माहिती दिली आहे.

१. मराठी भाषा विभाग (मुख्य मुख्यालय पोर्टल) :(https://marathi.maharashtra.gov.in)

पूर्वी या पोर्टलवर मराठी भाषे संबंधीची धोरणे, शासन निर्णय (GRs) आणि विविध समित्यांची माहिती साध्या आणि प्रश्न विचारता येण्याची सोय नव्हती (नॉन-रिस्पॉन्सिव्ह फॉरमॅट). जुने शासन निर्णय शोधण्यासाठी भरपूर वेळ जाई. त्याऐवजी आता या नवीन पोर्टलवर डायनॅमिक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. सर्व सरकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर थेट जाऊन सहज रित्या ती वापरात आणता येऊ शकतील (सुलभ नेव्हिगेशन, सिंगल साईन-ऑन -SSO). शासन निर्णय शोधण्यासाठी प्रगत GR सर्च फिल्टर बसवण्यात आला आहे.

२. भाषा संचालनालय :(https://directorate-marathi.maharashtra.gov.in)

सरकारी कामकाजासाठी आवश्यक असणारे प्रशासकीय शब्द व त्याचा शब्दकोश आणि प्रशासकीय शब्दांच्या पारिभाषा असणारी पुस्तके ही केवळ पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करता येत असत. डेटाबेस स्वरूपात शब्दांची तयार केलेली यादी व ती यादी लगेच उपलब्ध होईल याची थेट सुविधा नव्हती. प्रशासकीय शब्दकोशाचा संपूर्ण डेटाबेस अद्ययावत RDBMS वर हलवण्यात आला आहे. जे वापरकर्ते आहेत त्यांना इंग्रजी-टू-मराठी आणि मराठी-टू-इंग्रजी प्रशासकीय शब्दांचा शोध घेण्यासाठी रिअल-टाइम टाईप-अहेड (Type-ahead) शोधप्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३. राज्य मराठी विकास संस्था (RMVS): (https://rmvs-marathi.maharashtra.gov.in) 

मराठी भाषेच्या संगणकी प्रणालीशी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रम स्वतंत्रपणे राबवले जात असत, परंतु विविध संगणकीय साधने (फॉन्ट्स, कीबोर्ड लेआउट्स) मिळवण्यासाठी सगळ्यांना  मध्यवर्ती उपलब्ध होईल अशी माहिती प्रणाली ( डिजिटल रिपॉझिटरी) उपलब्ध नव्हती. नवीन पोर्टलवर मोफत डिजिटल रिपॉझिटरी तयार करण्यात आली आहे. येथून संशोधक आणि सामान्य नागरिक युनिकोड फॉन्ट्स, स्पेल-चेकर्स आणि भाषा-तंत्रज्ञानाची साधने थेट डाऊनलोड करू शकतात.

४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : (https://sahitya-marathi.maharashtra.gov.in)
मंडळाद्वारे प्रकाशित अभिजात ग्रंथ आणि दुर्मिळ साहित्य डाऊनलोड करण्यासाठी मोठ्या आकाराच्या पीडीएफ फाइल्सवर अवलंबून राहावे लागत असे, ज्यामुळे मोबाईल वर हे ग्रंथ वाचणे कठीण जात असे. नवीन संकेतस्थळावर In-browser e-Reader समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे कोणतीही फाइल डाऊनलोड न करता थेट ब्राऊझरमध्ये ई-पुस्तके वाचू शकतात.

५. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ: (https://marathivishwakosh.maharashtra.gov.in)

विश्वकोशाच्या नोंदी वेगवेगळ्या संकेत स्थळांवर  विखुरलेल्या होत्या. विषयानुसार वर्गीकरण सुटसुटीत नसल्याने ज्ञानमंडळांद्वारे तयार केलेल्या नवीन नोंदी शोधणे कठीण असे. अद्ययावत कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) लागू करण्यात आल्यामुळे  विज्ञान, तंत्रज्ञान, कला, इतिहास यांसारख्या विविध शाखांनुसार वर्गीकरण करून त्वरित शोधता येईल.

६. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड १ ते २०): (https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या १ ते २० खंडांचे केवळ स्कॅन केलेले फोटो (Images) उपलब्ध होते, ज्यामध्ये कोणताही मजकूर शोधता येत नव्हता. स्कॅन केलेल्या जुन्या हजारो पानांवर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) तंत्रज्ञान लागू करण्यात आल्यामुळे शब्दांवरून शोध करता येईल. यामुळे ऐतिहासिक १ ते २० खंडांमधील मजकूर लगेच उपलब्ध होईल.

७. मराठी परिभाषा कोश: (https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in)
विविध ५० ज्ञान शाखां मध्ये वापरल्या जाणाऱ्या पारिभाषा व त्या शब्दांचे संग्रह वेगवेगळ्या पीडीएफ किंवा टॅब्युलर फॉरमॅटमध्ये उपलब्ध होते, ज्यांची शोधक्षमता कमी वेग असणारी होती. लाखो शब्द मराठीतून इंग्रजी मध्ये व पुन्हा इंग्रजीतून मराठीमध्ये  वापरकर्ते इंग्रजी किंवा मराठी शब्द टाईप करून मिलिसेकंदात अचूक पारिभाषिक प्रतिशब्द मिळवू शकतात.

जुन्या कार्यपद्धतीतील काही प्रमुख त्रुटी

पूर्वी विविध कार्यालयांची संकेतस्थळे वेगवेगळ्या ठिकाणी जसे की .org, .com, .in किंवा स्वतंत्र खाजगी सर्व्हर्सवर चालवली जात होती. यामुळे नागरिकांना आणि संशोधकांना अधिकृत शासकीय पोर्टल कोणते हे ओळखणे कठीण जात असे. वेबसाईट सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक संस्थेकडे स्वतंत्र सर्व्हर आणि वेगळी व्यवस्थापन यंत्रणा होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न आणि नियमित ऑडिट करणे  यांसारख्या समस्या निर्माण होत असत.

मराठी भाषेचा अफाट ज्ञानकोशीय साठा, जसे की विश्वकोशाचे २० खंड आणि लाखो पारिभाषिक शब्द, विखुरलेल्या डोमेन्सवर उपलब्ध असल्याने गुगल सारख्या शोधयंत्रांना हा डेटाची योग्यरीत्या सूची करता येत नसे. परिणामी, सर्च रिझल्टमध्ये अधिकृत माहितीऐवजी विस्कळीत स्वरूपात माहिती दिसत असे. जुन्या संकेतस्थळांवर अनेक नोंदी व दस्तऐवज जुन्या फॉन्ट्समध्ये अपलोड केलेले असत. यामुळे मोबाईल किंवा आधुनिक संगणकीय उपकरणांवर मजकूर योग्य प्रकारे वाचता येणं शक्य नसे.

अन्य लेख

संबंधित लेख