Tuesday, August 18, 2026

बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अर्जुन-हरिहरनची दुसऱ्या फेरीत धडक

Share

बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन या जोडीने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडच्या स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांच्याविरुद्धच्या सामन्यात भारतीय जोडीने दमदार सुरुवात करत पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

https://x.com/bwfmedia/status/2089323271720186103/video/1

दुसऱ्या गेममध्ये अर्जुन-हरिहरन जोडी ६-४ अशी आघाडीवर असताना आयर्लंडच्या प्रतिस्पर्धी जोडीने दुखापतीमुळे सामना सोडला. त्यामुळे भारतीय जोडीला पुढील फेरीत प्रवेश मिळाला.

दरम्यान, स्पर्धेत आज भारताच्या काही प्रमुख खेळाडूंच्या लढतींकडे बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष लागले आहे. माजी जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू महिला एकेरीच्या सामन्यात आयर्लंडच्या सोफिया नोबल हिच्याविरुद्ध खेळणार आहे.

महिला दुहेरीत भारताची ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज यांच्याशी पहिल्या फेरीत भिडणार आहे.

संध्याकाळच्या सत्रात भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीत जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आणि विद्यमान विजेता चीनच्या शी यू ची याच्याविरुद्ध आव्हान उभे करणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख