Friday, September 11, 2026

MPSC ची परिक्षा लांबणीवर: विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

Share

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘गट-क सेवा’ संयुक्त पूर्व परीक्षा  आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापुर्वी ही परिक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने  काल ही माहिती देण्यात आली आहे. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत.

   दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारा विरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध 18 मागण्यांचं निवेदन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

आयोगाने गट क परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. या पूर्वी आयोगाने १२ जुलै, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर अशा तीन वेळा परीक्षा घेण्याचे जाहीर करुन पुढे ठकलली आहे. २०२६ च्या परीक्षेची प्रक्रिया डिसेंबरमध्ये पू्र्ण होणे आवश्यक असताना आता ही परीक्षा आणि पुढील प्रक्रिया २०२७ मध्ये होणार आहे.   

अन्य लेख

संबंधित लेख