Thursday, October 29, 2026

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभाच्या रकमेत वाढ

Share

महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी राज्य शासनाने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

भटक्या जीवनशैलीमुळे व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहतात. उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये राहताना विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्याचा खर्च पेलणे कठीण जाते. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’च्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या या योजनेतील भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय ६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

शिक्षणाच्या ठिकाणानुसार सुधारित वार्षिक आर्थिक लाभ:

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यापोटी शिक्षणाच्या ठिकाणानुसार पुढीलप्रमाणे आर्थिक मदत मिळणार आहे:

अनु. क्र.शिक्षणाचे ठिकाण / शहरभोजन भत्तानिवास भत्तानिर्वाह भत्ताएकूण वार्षिक लाभ
१मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर₹ ४२,०००/-₹ २८,०००/-₹ १०,०००/-₹ ८०,०००/-
२इतर महसूल विभागीय शहरे आणि उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रे₹ ३७,०००/-₹ २१,०००/-₹ १०,०००/-₹ ६८,०००/-
३इतर जिल्ह्यांची ठिकाणे तसेच महानगरपालिका हद्दीपासून ५ किमी परिसरातील संस्था₹ ३२,०००/-₹ १७,०००/-₹ ८,०००/-₹ ५७,०००/-
४तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी₹ ३०,०००/-₹ १३,०००/-₹ ७,०००/-₹ ५०,०००/-

शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त ठोक रक्कम:

भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी वार्षिक ठोक मदत खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आली आहे:

वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखा: प्रतिवर्षी ₹ ८,०००/-
इतर शाखा: प्रतिवर्षी ₹ ४,०००/-

अन्य लेख

संबंधित लेख