Tuesday, October 27, 2026

बसंतियाच्या हिंदूंची ३६ वर्षांची प्रतिक्षा संपली

Share

१९९०… पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचा एकछत्री अंमल सुरू होता…

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील बसंतिया येथील ‘राणी पुकुर’ (तलाव) आणि फुलबनी गावात माँ दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूकीला (निरंजन शोभायात्रा) स्थानिक मुस्लीम समाजाने तीव्र आक्षेप घेतला…

या विरोधानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला… कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धार्मिक तेढ टाळण्यासाठी प्रशासनाने त्यावेळी हस्तक्षेप केला…

धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला (Left Front) हिंदू समाजाच्या धार्मिक भावना… श्रद्धा यांच्याशी काहीच देणेघेणे नव्हते… मात्र त्यांना एकगठ्ठा मतदान करणारा मुस्लिम मतदार दुखवायचा नव्हता म्हणून…

“संवेदनशील परिस्थिती” आणि “कायदा-सुव्यवस्थे”चे कारण पुढे करत कम्युनिस्ट सरकारने हिंदू भाविकांना ‘राणी पुकुर’ तलावात विसर्जनाची परवानगी नाकारली…

‘पुकुर’ हा बंगाली संस्कृतीच्या वास्तुशास्त्रातील अविभाज्य भाग आहे… पुकुर (पोखर) म्हणजे तळे… प्रत्येक बंगाली घराला लागून लहान मोठे का होईना पण पुकुर असतेच… बंगाली लोकांच्या जीवनशैलीचा आणि संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे…

बंगाली लोकांच्या आहारात माशांचे स्थान अढळ आहे… प्रत्येक कुटुंब आपल्या गरजेनुसार या पुकुरामध्ये मासे पाळतात (उदा. रोहू, कातला, पुटी, शिंगी)… घरात अचानक पाहुणे आले किंवा रोजच्या जेवणासाठी ताजे मासे हवे असतील, तर या तलावातून लगेच मासे पकडले जातात…

बाकी बंगालच्या अनेक गावांमध्ये घरची भांडी घासणे, कपडे धुणे आणि आंघोळीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो…

बंगाली संस्कृतीतील अनेक सण, पूजा, लग्नकार्याशी संबंधित विधी आणि दुर्गा पूजेच्या वेळी कलश स्थापना किंवा मूर्ती विसर्जन यांसारख्या धार्मिक कार्यांसाठी या पुकराचा वापर केला जातो…

हिंदूद्वेष्ट्या कम्युनिस्ट राजवटीमुळे पुढे कायम हिंदू समाजाला विसर्जनाची पारंपरिक रीत बदलणे भाग पडले…

काही प्रसंगी तर मूर्तीचे विसर्जन इतर दुसऱ्या लहान तलावात केले गेले… तर काही वेळा धार्मिक विधी पूर्ण न करता मूर्ती भूमीत पुरण्याची (माती देण्याची) वेळही हिंदू भाविकांवर आली…

पुढची २१ वर्षे कम्युनिस्ट राजवटीत बसंतिया आणि फुलबनीचा सकल हिंदू समाज मान खाली घालून दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव मान खाली घालून साजरा करत होता…

२०११ साली पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाले… धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या कम्युनिस्टांची सत्ता जाऊन “मां, माटी आणि मानुष” ची घोषणा देऊन ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस सत्तेत आली…

बसंतिया आणि फुलबनीच्या सकल हिंदू समाजाच्या… आतातरी आपल्याला  ‘राणी पुकुर’ मध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल आणि फुलबनीत माँ दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूकीला (निरंजन शोभायात्रा) परवानगी मिळेल अशा आशा पल्लवीत झाल्या…

मात्र प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसच्या “मां, माटी आणि मानुष”  मधील मानुष हा फक्त मुसलमान होता… हिंदू मानुष तृणमूल काँग्रेसच्या नजरेत मानुष नव्हताच… तृणमूल काँग्रेसने निव्वळ मुस्लिम मतदारांचेच नाही तर बांगलादेशी घुसखोर मुसलमान व रोहिंग्या यांचे अपरिमित लांगुलचालन केले…

त्यामुळे “संवेदनशील परिस्थिती” आणि “कायदा-सुव्यवस्थे”चे कारण पुढे करत कम्युनिस्ट सरकारने हिंदू भाविकांना ‘राणी पुकुर’ तलावात विसर्जनाची नाकारलेली परवानगी तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत पुढे तशीच चालू राहील… सकल हिंदू समाज अपमानित होत राहिला… मान खाली घालून दुर्गा मातेची नवरात्र साजरा करत राहिला… अशी पुढची १५ वर्षे गेली आणि २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या सकल हिंदू समाजाने चमत्कार केला…

त्याला आपल्या एका मताची किंमत कळली… “बटेंगे तो कटेंगे”चा नेमका अर्थ कळला… “जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी” ची साद ऐकू आली… कम्युनिस्ट किंवा तृणमूल काँग्रेस पुन्हा निवडून आली तर आपले अस्तित्वच नष्ट होईल हे पश्चिम बंगालच्या सकल हिंदू समाजाच्या लक्षात आले…

आणि TMC मधला M म्हणजे मुसलमान वाटावा एव्हढी लांगूलचालनाची परिसीमा गाठणारी तृणमूल काँग्रेस अक्षरशः देशोधडीला लागली… धर्माला अफूची गोळी मानणारे… लाल फडके मिरवणारे कम्युनिस्ट तर राज्यात शोधून सापडेनासे झाले…

२९४ सदस्यांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने २०९ जागांवर बाजी मारली… आणि शुभेन्दू अधिकारी यांच्यासारखा हिंदुत्वाचा कैवार घेतलेला खमका मुख्यमंत्री लाभला… आणि बसंतिया आणि फुलबनीच्या सकल हिंदू समाजाच्या आनंदाला उधाण आले…

३६ वर्षांनंतर पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील बसंतिया येथील राणी पुकुर येथे माता दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन पुन्हा सुरू झाले… त्यासाठी पश्चिम बंगालची राजसत्ता स्थानिक हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभी होती…

स्थानिक मुस्लिमांच्या विरोधामुळे १९९० मध्ये थांबवण्यात आलेली आणि पूर्वीच्या सरकारांनी नाकारलेली ही मिरवणूक… अखेरीस विरोध करणाऱ्या स्थानिक मुसलमानांच्या नाकावर टिच्चून… १,००० हून अधिक… कपाळावर केशरी टिळा लावलेल्या… गळ्यात भगवे गमछे घातलेल्या… हातात भगवे ध्वज घेतलेल्या आणि ताठ मानेने छाती पुढे काढून तारस्वरात दुर्गा मातेसह भारत मातेचा जयघोष करणाऱ्या हिंदू तरुणांच्या नेतृत्वाखाली पार पडली… सकल हिंदू समाजासाठी हा एक बहुप्रतिक्षित क्षण होता…

सुसंघटित बलशाली हिंदू समाजाची नित्यसिद्ध शक्तीच आपल्या मातृभूमीला परम वैभवाला नेऊ शकते हेच बसंतियाच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले…

हे केवळ विसर्जन दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन नव्हते… तर आपल्याच भूमीत आपल्या श्रद्धेचे पालन करण्याच्या सांस्कृतिक आणि घटनात्मक हक्काची ती पुनर्स्थापना होती… सकल हिंदू समाजाचा तो संघटित हुंकार होता…

जय माँ दुर्गा… भारत माता की जय 

अन्य लेख

संबंधित लेख