Tuesday, November 3, 2026

वाणी ममता बॅनर्जी यांची पण शब्द जहूर इब्राहिमचे 

Share

रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस प्रणित इंडी (INDI) आघाडीतर्फे ‘देश बचाओ महारॅली’चे आयोजन करण्यात आले होते… लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते…

या रॅलीला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ताळतंत्र सोडून टीका केली…

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ते आम्हाला घराबाहेर पडू नका, असे सांगतात. त्यांनी आम्हाला नजरकैदेतही ठेवले होते. पण मी सांगते की, जे लढतात ते आयुष्य जगतात आणि जे घाबरतात ते मरतात. जे काफिर आहेत, ते दररोज घाबरतात. आगामी काळातील घोषणा आहे, ‘सेव्ह इंडिया, सेव्ह डेमोक्रसी’. सर्वांनी मिळून भाजपविरोधात लढले पाहिजे.”…

“जे काफिर आहेत, ते दररोज घाबरतात”… असं ममता बॅनर्जी जाहीरपणे INDI आघाडीच्या व्यासपीठावरून बोलल्या आणि त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या एकाही घटक पक्षाच्या एकाही नेत्याने त्याला आक्षेप घेतला नाही… याचा अर्थ ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याला त्यांची मूक संमती आहे…

आता इथे “काफीर” कोण ते आपण समजून घेऊ…

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचे सगळे मापदंड बदलून टाकणाऱ्या… आणि सत्य घटनांवर चित्रित केलेल्या धुरंधर चित्रपटात… २४ डिसेंबर १९९९ रोजी भारताच्या इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अफगाणिस्तानातल्या कंदहार येथे झालेले अपहरण प्रकरण अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकार समर्थित हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या… इब्राहिम अठहर, शाहिद अख्तर सईद, सन्नी अहमद काजी, जहूर इब्राहिम, आणि शकीर या ५ सशस्त्र सदस्यांनी हे अपहरण केले…

या दहशतवाद्यांशी बोलणी करण्यासाठी सुरुवातीला भारत सरकारतर्फे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी… अजित डोवाल (चित्रपटात अजय सान्याल) जातात…

त्यावेळी वाटाघाटी च्या दरम्यान जहूर इब्राहिम (चित्रपटात जहूर मिस्त्री/ नंतर बदललेले नाव झाहिद अखुंड) अजित डोवाल यांना एक डायलॉग मारतो…

“हिंदू बहुत डरपोक कौम है, पड़ोस में ही रहते हैं हम, गूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो…”…

जहूर इब्राहिमच्या… “हिंदू बहुत डरपोक कौम है”… या डायलॉगमधील “हिंदू” म्हणजेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मुसलमानांसाठी “काफीर”…

इस्लाममध्ये ‘काफिर’ (Kafir – काफ़िर) या अरबी शब्दाचा मूळ अर्थ… ‘सत्य किंवा उपकार लपवणारा’ किंवा ‘अस्वीकार करणारा’ असा होतो…

काफिर हा शब्द ‘कुफ्र’ (Kufr) या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘झाकणे’ किंवा ‘लपवणे’ असा होतो…

वैचारिकदृष्ट्या, जो व्यक्ती ईश्वराचे (म्हणजे फक्त अल्लाहचे) अस्तित्व, त्याचे संदेश किंवा इस्लामचे सत्य माहीत असूनही ते नाकारतो किंवा लपवतो, त्याला ‘काफिर’ म्हटले जाते… या व्याख्येप्रमाणे सकल हिंदू समाज हा मुसलमानांच्या दृष्टीने “काफिर” आहे…

जहूर इब्राहिमचा “हिंदू” हा शब्द “काफिर”चा समानार्थी व पर्यायवाची शब्द आहे…

आणि म्हणून तो म्हणतो… “हिंदू बहुत डरपोक कौम है”… या  त्याच्या गरळ ओकणाऱ्या वाक्यातून “हिंदूं” विषयीचा त्याचा परापोटीचा द्वेष दिसून येतो…

ममता बॅनर्जी यांनी नेमका जहूर इब्राहिमचाच डायलॉग… हिंदूच्या ऐवजी काफिर हा समानार्थी व पर्यायवाची शब्द वापरून मारला आहे… “जे काफिर आहेत, ते दररोज घाबरतात”… आणि त्यांच्या या वक्तव्यातून त्यांचा जहूर इब्राहिम एव्हढाच सकल हिंदू समाजाविषयीचा पराकोटीचा द्वेष लक्षात येतो…

त्यांनी हा डायलॉग का मारला असेल?… या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांची जडणघडण कशी झाली हे बघणे महत्त्वाचे आहे…

ममता बॅनर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातून ‘इस्लामिक इतिहास’ (Islamic History) या विषयात पदव्युत्तर पदवी (M.A. – Master of Arts) मिळवली आहे…

त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली… काँग्रेस पक्षाने आजपर्यंत अल्पसंख्याकांचे (अर्थात मुसलमानांचे) अपरिमित लांगुलचालन केलेले आहे… तेच संस्कार ममता बॅनर्जीच्या रक्तामांसात खोलवर रुजले आहेत…

पुढे काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर… ममता बॅनर्जी यांना कम्युनिस्टांकडून खेचून घेऊन सत्ता मिळवण्यासाठी… पश्चिम बंगालचा मुसलमान… अवैध घुसखोरी करून भारतात शिरलेला बांगलादेशचा मुसलमान व रोहिंग्या मुसलमान… या “मुस्लिम” मतपेढीची बेसुमार खुशामत करावी लागली… त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या सकल हिंदू समाजाच्या आस्था श्रद्धा भावना यांना काडीची किंमत दिली नाही… वेळप्रसंगी मुसलमानांना खुश करण्यासाठी सकल हिंदू समाजावर अत्याचार करायला देखील मागेपुढे पाहिले नाही… आजही त्यांच्या पक्षाचा “मुसलमान” हाच हक्काचा मतदार आहे… त्यामुळे मुसलमानांचे लांगुलचालन त्यांच्या हाडीमाशी खिळले आहे…

इस्लामिक इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि आपली संपूर्ण राजकीय हयात मुसलमानांचे अपरिमित लांगुलचालन करण्यात घालवलेल्या ममता बॅनर्जी यांनी आतंकवादी जहूर इब्राहिमचाच डायलॉग मारला असेल तर त्यात नवल ते काय?…

कदाचित मुख्यमंत्री पद गेल्यामुळे रिकामटेकड्या ममता बॅनर्जी यांनी गेल्या ६ महिन्यात वेळ घालवण्यासाठी धुरंधर चित्रपट बऱ्याच वेळा बघितला असावा…

आणि जहूर इब्राहिमचा “हिंदू बहुत डरपोक कौम है” हा डायलॉग त्यांना आवडून तोंडपाठ झाला असावा… मात्र ममता बॅनर्जी यांच्यासाठी “हिंदू” हा शब्द पूर्णपणे निषिद्ध असल्यामुळे त्यांनी त्याचा समानार्थी व पर्यायवाची “काफिर” हा शब्द वापरला असावा…

आतंकवादी जहूर इब्राहीम (जहूर मिस्त्री) हा १ मार्च २०२२ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराची येथे “अज्ञात” व्यक्तींच्या गोळीबारात कुत्र्याच्या मौतीने मारला गेला…

आणि  ७ मे २०२६ ला ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली… तेव्हापासून धुरंधर चित्रपट परत परत बघता बघता कदाचित

जहूर इब्राहीमची “रुह” (आत्मा) ममता बॅनर्जी यांच्या “जिस्म” (शरीर) मध्ये प्रवेश करती झाली असेल…

जहूर इब्राहीमच्या अतृप्त आत्म्याला हिंदूंच्या अर्थात् काफीरांच्या सर्वनाशाची बाकी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी ममता बॅनर्जी शिवाय दुसरी अनुरूप काया कुठे सापडणार?… “दो जिस्म मगर एक जान है हम”… इतके जहूर बॅनर्जी आणि ममता इब्राहिम यांचे हिंदुत्वेषाचे अद्वैत आहे…

आता कसोटी आहे ती सकल हिंदू समाजाची…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकार समर्थित आतंकवादी जहूर इब्राहिम आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत… हे नाणे हिंदु द्वेषाचे पर्यायाने हिंदू बहुल भारत द्वेषाचे आहे…

त्यामुळे पराकोटीचा हिंदुद्वेष करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आणि त्यांच्या “जे काफिर आहेत, ते दररोज घाबरतात” या सकल हिंदू समाजाच्या मुळावर उठणाऱ्या वक्तव्याला मूक संमती देणाऱ्या काँग्रेससह समाजवादी पार्टी, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांना सत्तेच्या आसपास देखील फिरकू न देणे… हे सकल हिंदू समाजाचे आद्य कर्तव्य ठरते… कारण प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे…

जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी…

अन्य लेख

संबंधित लेख